घटस्फोटानंतर परत प्रेमात पडला हनी सिंह?, गर्लफ्रेंडच्या हातामध्ये हात टाकून…

| Updated on: Sep 29, 2024 | 3:03 PM

हनी सिंह हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हनी सिंहचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. हनी सिंह हा सध्या जास्त वेळ दुबईमध्ये राहतोय. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यापासून आपले आयुष्य जीम ते स्टुडिओपर्यंत मर्यादीत झाल्याचे सांगताना हनी दिसला होता.

घटस्फोटानंतर परत प्रेमात पडला हनी सिंह?, गर्लफ्रेंडच्या हातामध्ये हात टाकून...
Honey Singh
Follow us on

हनी सिंह हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हनी सिंहची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही वर्षानंतर हनी सिंह याने धमाकेदार पद्धतीने पुनरागमन केलंय. नशेमध्ये आपल्या आयुष्यातील काही महत्वाची वर्ष खराब झाल्याचे हनीने म्हटले. हेच नाही तर मागील काही दिवसांमध्ये आपण पूर्णपणे नशेत होतो. आपल्यासोबत काय सुरू आहे आणि बाहेर काय घडत आहे हे देखील आपल्याला माहिती नसल्याचे हनी सिंहने मान्य केले. फक्त हेच नाही तर हनी सिंह म्हणाला होता की, दिवस कधी व्हायचा आणि रात्र कधी हेच मला कळत नव्हते. मी नशेत पूर्णपणे गेलो होतो.

नशेपासून दूर राहण्यासाठी आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपण खूप जास्त मेहनत घेतल्याचेही हनी सिंह याने म्हटले. आता नुकताच हनी सिंह हा IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पोहोचला. यावेळी तो एका सुंदर मुलीसोबत दाखल झाला. दोघांनीही एकमेकांच्या हातामध्ये हात दिल्याचे बघायला मिळाले. फोटोसाठीही एकत्र पोझ दिल्या.

फोटोसाठी पोझ देत असताना काहीतरी एकमेकांना बोलताना देखील ती मुलगी आणि हनी सिंह हे दिसले. हनी सिंह आणि त्या मुलीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडताना दिसत आहे. ही मुलगी हनी सिंह याची नवीन गर्लफ्रेंड असल्याचेही सांगितले जातंय. दोघांचे आता अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

2011 मध्ये हनी सिंह याने शालिनी तलवार हिच्यासोबत लग्न केले. शालिनी तलवार हिने अत्यंत गंभीर आरोप हे हनी सिंह याच्यावर केले. शेवटी दोघांचा घटस्फोट झाला. हेच नाही तर शालिनी तलवार हिच्यासोबत घटस्फोट घेणे हनीसाठी सोपे नव्हते. खूप मोठी तगडी रक्कम हनी सिंह याला शालिनी तलवार हिला द्यावी लागली.

शालिनी तलवार हिच्यानंतर टीना थडानी ही हनी सिंह याच्या आयुष्यात आली. टीना थडानी आणि हनी सिंह हे एक वर्ष एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर यांच्या ब्रेकअपची चर्चा ही सुरू झाली. आता या नवीन मुलीच्या प्रेमात हनी असल्याचे सांगितले जातंय. ही मुलगी मोरक्कन मॉडेल असल्याचे सांगितवे जात आहे.