मुंबई : 6 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे. सिनेमातील गाणी आणि काही सीन देखील सोशल मीडियावर तुफान चर्चेत असताना, अभिनेत्रीचा एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला लिफ्टमध्ये येत असताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे ऍपच्या मदतीने महिलेला अभिनेत्रीने प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हिडीओ व्हायरल होत असून, सोशल मीडियावर व्हिडीओ विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.
रश्मिका हिचा फेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एआयच्या माध्यमातून व्हिडीओ तयार करण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. पण व्हिडीओमध्ये दिसणार महिला रश्मिका नसून दुसरीच कोणी महिला आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारी महिला भारतीय – ब्रिटीश आहे. इन्स्टाग्रामवर तिचे चार लाख 16 हजार युजर्स असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ महिलेने ऑक्टोबर महिन्यात तिच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलाचं नाव झारा पटेल असं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी कडक कारवाईची मागणी करत आहेत.
DEEPFAKE DECEPTION: URGENT ACTION NEEDED IN INDIA
Have you fallen for the latest viral video on Instagram featuring actress #RashmikaMandanna?
Hold on, it’s not what it seems
That video is a dangerous deepfake impersonation of #ZaraPatel.
In the realm of deepfakes, this… pic.twitter.com/bR18Wrpanc
— Meedas Sahoo (@MeedasSahoo) November 5, 2023
असंख्या नेटकऱ्यांनी मूळ व्हिडिओ देखील शेअर करत फक्त प्रसिद्ध मिळवण्यासाठी असे व्हिडीओ तयार केल्यामुळे सुनावलं आहे. एवढंच नाही तर, व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर जोर धरत आहे. सध्या सर्वत्र रश्मिका हिच्या फेक व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
रश्मिका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे आणि तिचा फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. रश्मिका एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत चाहते असतात. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देखील रश्मिका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण आता अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.