अवनीत कौरने गुपचूप उरकला साखरपुडा; म्हणाली, ‘चांगल्या गोष्टी कायम उशीरा…’

| Updated on: May 29, 2024 | 12:49 PM

Avneet Kaur : वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेत्री अवनीत कौरने गुपचूप उरकला साखरपुडा, आंगठीचा फोटो पोस्ट करत म्हणाली, 'चांगल्या गोष्टी कायम उशीरा...', अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

अवनीत कौरने गुपचूप उरकला साखरपुडा; म्हणाली, चांगल्या गोष्टी कायम उशीरा...
Follow us on

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अवनीत तिच्या फॅशन सेन्समुळे देखील कायम चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड अदा आणि अन्य कोणत्या कारणामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अवनीत हिने गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र अवनीत हिच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे.

कान फिल्म फेस्टिवल (Cannes 2024) मध्ये जलवा दाखवणारी अवनीत हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री चाहत्यांना आंगठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे अवनीत हिने कोणालाही न सांगता साखरपुडा केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

अवनीत हिने जे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, त्या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या डाव्या हातातील आंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. ज्यामुळे अभिनेत्रीने कधी आणि कोणासोबत साखरपुडा केला? असा प्रश्न चाहते कमेंटमध्ये विचारत आहेत.

फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, ‘चांगल्या गोष्टी घडण्यासाठी उशीर लागतो… या युनियनबद्दल आणि पुढे काय होणार आहे हे जगाला सांगण्याची प्रतीक्षा मी आता करू शकत नाही…’ असं लिहिलं आहे. अशात अभिनेत्रीने साखरपुडा उरकल्याची शक्यता चाहत्यांच्या मनात दाट झाली आहे.

अवनीत हिच्या फोटोंवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘लवकर सांग तो प्रिंस कोण आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अवनीत आता साखरपुडा कशी करू शकते. ती फक्त 23 वर्षांची आहे…’, पण यावर अभिनेत्रीने अधिकृत वक्तव्य केलं आहे.

अवनीत कौर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचं नाव राघव शर्मा याच्यासोबत जोडलं जात आहे. दोघे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र आहेत. अनेक ठिकाणी अवनीत – राघव यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

रिपोर्टनुसार, अवनीतच्या लंडन टूरमध्येही राघव त्याचा क्रिकेटर मित्र शुभम गिलसोबत दिसला होता. मात्र, या नात्याबाबत अवनीत किंवा राघवकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. सध्या सर्वत्र अवनीत हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.