Vikrant Rona | किच्चा सुदीपचा ‘विक्रांत रोना’ चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली इतकी कमाई
विक्रांत रोना हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. या खास चित्रपटाचे बजेट 95 कोटींचे आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट पहिल्या दिवशी 40 कोटींची कमाई करू शकतो. म्हणजेच काय तर या चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त ठरणार हे नक्की. विक्रांत रोना या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

मुंबई : साऊथचा सुपरस्टार किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) विक्रांत रोना हा बहुचर्चिच चित्रपट आज रिलीज होणार आहे. किच्चा सुदीप व्यतिरिक्त या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच चाहते या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होते. हा चित्रपट आज म्हणजेच गुरुवारी 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.‘विक्रांत रोना’ (Vikrant Rona) हा चित्रपट हिंदीसह एकूण 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसते आहे. आजच्या पहिल्याच दिवशी चित्रपट (Movie) किती कमाई करेल हे बघण्यासारखेच ठरणार आहे.
विक्रांत रोना चित्रपटाचे बजेट तब्बल 95 कोटी
विक्रांत रोना हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे. या खास चित्रपटाचे बजेट 95 कोटींचे आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट पहिल्या दिवशी 40 कोटींची कमाई करू शकतो. म्हणजेच काय तर या चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त ठरणार हे नक्की. विक्रांत रोना या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा चित्रपट 2D व्यतिरिक्त 3D मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विक्रांत रोनाच्या बुकिंगला खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळतोयं. केवळ अॅडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटाने सुमारे 4.11 कोटी रुपये कमावले आहेत.



अॅडव्हान्स बुकिंगबद्दलच चित्रपटाने केली 37 लाखांची कमाई
हिंदी व्हर्जनच्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने 37 लाखांची कमाई केली आहे. यापूर्वी पुष्पा चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 35 कोटींची कमाई केली होती. माहितीनुसार विक्रांत रोना हा चित्रपट केवळ भारतात 3 हजारांहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित करण्याचा प्लान आहे. कर्नाटकमध्ये हा चित्रपट 450 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. जो आता सर्वात जास्त स्क्रीनवर प्रदर्शित होणारा पहिला कन्नड चित्रपट असेल. हिंदी व्हर्जनबद्दल बोलायचे झाले तर ते 1500 स्क्रीन्सवर दाखवले जाणार आहे. यामुळेच विक्रांत रोना हा चित्रपट अनेक रेकाॅर्ड तोडणार हे नक्कीच आहे.