अभिनेत्री ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान ईशा बहीण अहाना देओल हिच्यासोबत मथुरा येथे प्रचारासाठी पोहोचली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशातील मथुरा येथे प्रचारासाठी ईशा देओल तिची आई हेमा मालिनी यांच्यासोबत गेली. यावेळी ईशा हिने मथुरेतील पर्यटनाबाबत देखील स्वतःचं मत मांजलं, मात्र, नेटिझन्सनी तिच्या ओठांची दखल घेतली आणि तिच्यावर लिप फिलर केल्याचा आरोप केला. त्यानंतर अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आले.
सध्या ईशा देओल हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘सर्वकाही सोडा… ईशा देओल हिच्या ओठांना काय झालं आहे…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आम्हाला फक्त ईशा हिच्या ओठांचा विकास दिसत आहे…’ सध्या सर्वत्र ईशा देओल हिने ओठांची प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा रंगत आहे.
#WATCH | Uttar Pradesh: BJP candidate from Mathura constituency Hema Malini’s daughters Esha Deol and Ahana Deol visit Mathura.
Actress Esha Deol says, “…This place has developed a lot. The heritage and tourism are maintained and preserved here… There are a lot of supporters… pic.twitter.com/dGNNeyR7TD
— ANI (@ANI) April 20, 2024
ईशा देओल हिने 29 जून 2012 रोजी भरत तख्तानी याच्यासोबत लग्न केले आणि एका दशकाहून अधिक काळ लग्न झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा आणि भरत यांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. ईशा हिने दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे…’
जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘हा निर्णय आमच्या मुलींसाठी फार महत्त्वाचा होता.’ एवढंच नाही तर, नाजूक काळात, ईशा आणि भरत यांनी गोपनीयतेचे आवाहनही केलं होतं. घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलींचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे.
सांगायचं झालं तर, घटस्फोटाची घोषणा करण्यापूर्वी अनेक दिवासांपासून ईशा हिच्या खासगी आयुष्यात संकट आल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये देखील भरत उपस्थित नव्हता. तेव्हापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. एवढंच नाहीतर, ईशा हिने पतीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं देखील बंद केलं होतं.
अखेर ईशा आणि भरत यांनी 6 फेब्रुवारी 2024 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. घटस्फोटानंतर ईशा देओल सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्ट चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.