Manisha Koirala | 12 सेलिब्रिटींसोबत होते मनीषा हिचे प्रेमसंबंध; उद्योजकासोबत लग्न होताच म्हणाली, ‘पतीच शत्रू झाला…’
एक दोन नाही तर, 12 सेलिब्रिटींना मनिषा कोईराला हिने केलं डेट; श्रीमंत उद्योजकासोबत अभिनेत्रीचं लग्न तर झालं, पण घटस्फोटानंतर म्हणाली ‘पतीच शत्रू झाला…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मनीषा कोईराला हिची चर्चा...
मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : ‘सौदागर’, ‘1942: ए लव स्टोरी’, ‘बॉम्बे’, ‘अग्नि साक्षी’, ‘गुप्त’ आणि ‘मन’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री मनीषा कोईराला (Manisha Koirala) हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री ‘संजू’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन देखील केलं. एक काळ बॉलिवूड गाजवणारी मनीषा कोईराला हिच्या आज सर्वकाही आहे. पण अभिनेत्री पैसा, प्रसिद्धी संपत्ती असूनही एकटी आयुष्य जगते. अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली नाही असं काहीही नाही. अभिनेत्याच्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम कधी टिकलचं नाही. बॉविलूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रीने एक दोन नाही तर 12 सेलिब्रिटींना डेट केलं.
अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेल्या मनीषाचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील मनिषा हिचं नाव जोडण्यात आलं.. नाना पाटेकर यांच्याशिवाय मनिषाचं नाव विवेक मुशरान, डिजे हुसैन, सेसिल एंथनी , आर्यन वेद, प्रशांत चौधरी, क्रिस्पिन कॉनरॉय, तारिक प्रेमजी, राजीव मूलचंदानी क्रिस्टोफर डोरिस यांच्यासोबत जोडण्यात आलं..
पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने 19 जून 2010 साली नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत केलं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघांच्या नात्यात वादाची ठिणगी पेटू लागली.. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशात अभिनेत्री एका मुलाखतीत ‘माझ्या आयुष्यात पुरुषांचं प्रेम नाही..’ असं वक्तव्य केलं.
पुरुषाच्या प्रेमा बद्दलच नाहीतर अभिनेत्रीने पतीच्या उल्लेख शत्रू म्हणून केला होता. घटस्फोटानंतर जेव्हा अभिनेत्रीने खासगी आयुष्याचा खुलासा केला, तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नाच्या सहा महिन्यांनंतर पतीच माझा शत्रू झाला. एका महिलेसाठी यापेक्षा वाईट काय असू शकतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.’
मनिषाने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे’ या सिनेमातील मनीषाच्या कामाची खूप प्रशंसा झाली. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. आजही अभिनेत्रीच्या सिनेमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्रीच्या ‘मन’ सिनेमातील काही सीन आणि डायलॉग चाहते आजही विसरु शकलेले नाहीत. मनीषा कोईराला हिचा आज वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगत आहेत.