अरे वाह! ‘हीरामंडी 2’ लवकरच; मनीषा कोईरालाने सांगितली तारिख
2024 ची सर्वात गाजलेली सीरिज म्हणजे 'हीरामंडी'. त्यातील गाणी, कलाकार, डायलॉग सर्वांवरच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. ही सीरिज सर्वांच्याच मनात घर करून गेली. सीरिज संपूच नये असं सर्वांना वाटत होतं. चाहत्यांची हीच इच्छा आता पूर्ण होणार आहे. 'हीरामंडी 2' देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
2024 ची सर्वात गाजलेली सीरिज म्हणजे ‘हीरामंडी’. त्यातील गाणी, कलाकार, डायलॉग सर्वांवरच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. ही सीरिज सर्वांच्याच मनात घर करून गेली. सीरिज संपूच नये असं सर्वांना वाटत होतं. चाहत्यांची हीच इच्छा आता पूर्ण होणार आहे. ‘हीरामंडी 2’ देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
अनेक स्टार्सची भूमिका असलेली ही मालिका 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींनी कौतुकास्पद काम केलं आहे. या सीरिजला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. आता सर्वजण ‘हीरामंडी’च्या दुसऱ्या भागाची वाट पाहात होते.. प्रेक्षकांना उत्सुकता होती ती दुसऱ्या सीझनची. आता मनीषा कोईराला हिने हिरामंडीच्या दुसऱ्या सीझनचे मोठी अपडेट दिली आहे. मनीषा कोईरालाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या डेब्यू वेब सीरिजमधून जोरदार पुनरागमन केले.
इंडिया टुडेशी खास बातचीत करताना मनीषा कोईरालाने ‘हीरामंडी 2’ या सीरिजविषयी वक्तव्य केले आहे. ‘हीरामंडी 2′ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचे शूटिंग पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सुरू होऊ शकतं असही ती म्हणाली. आम्ही सगळे परत एकत्र येण्याची वाट पाहात आहोत’ असेही मनीषाने म्हटलं.
या संभाषणादरम्यान मनीषाला विचारण्यात आले की, ‘हीरामंडी’ प्रदर्शित झाल्यानंतर तिला काही ऑफर आल्या का? या प्रश्नाचे उत्तर देताना मनीषा म्हणाली की, हो.. काही स्क्रीप्टचा मी विचार करत आहे. पण प्रोजेक्ट फायनल झाल्यानंतरच ती याबद्दल बोलेल.’असं म्हणत काही फायनल होईपर्यंत आपण कोणतीही माहिती शेअर करणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.
हिरामंडी हे संजय लीला भन्साळी यांचे हे मोठे प्रोजेक्ट आहे. या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शर्मीन सेगल, फरदीन खान, ताहा शाह बदुशाह, अध्यायन सुमन, शेखर सुमन आणि जेसन शाह यांसारखे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. दरम्यान मनिषा कोईरालाने दिलेल्या या माहितीमुळे चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार. तसेच हिरामंडीच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना अजून काय नवीन पाहायला मिळणार याबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे.