Jaya Bachchan यांचा मोठा खुलासा, ‘अमिताभ बच्चन माझ्यासोबत कधीच रोमाँटिक नव्हते, पण गर्लफ्रेंडसोबत…’

Jaya Bachchan | जया बच्चन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याला आलं होतं उधाण... मुलाखतीत जया बच्चन यांनी बिग बी यांच्यासोबत असलेल्या नात्याचा केला मोठा खुलासा...

Jaya Bachchan यांचा मोठा खुलासा, 'अमिताभ बच्चन माझ्यासोबत कधीच रोमाँटिक नव्हते, पण गर्लफ्रेंडसोबत...'
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 12:53 PM

मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. जया बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत लग्न केलं आणि अभिनेता रेखा यांच्यासोबत बिग बी यांच्या नात्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याच्या चर्चा आज देखील चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण एका मुलाखतीत जया बच्चन यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, ‘अमिताभ बच्चन माझ्यासोबत कधीच रोमाँटीक नव्हते…’ असं म्हणत जया याने बिग बी यांच्या गर्लफ्रेंडबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.

एका मुलाखतीत जया बच्चन यांना ‘अमिताभ बच्चन रोमाँटीक आहेत का?’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं जया बच्चन यांनी उत्तर हिल्यानंतर बिग बी देखील हैराण झाले. ‘मला नाही वाटत अमिताभ बच्चन रोमाँटिक आहे. कमीत कमी माझ्यासोबत तरी नाही. कदाचित त्यांची गर्लफ्रेंड असती तर अमिताभ बच्चन यांनी तिच्यासाठी फूल, वाईन आणणं, रोमाँटिक होणं असं सर्वकाही केलं असतं…’ एवढंच नाही तर, अमिताभ बच्चन लाजाळू आहेत… असं देखील जया बच्चन म्हणाल्या होत्या.

जया बच्चन यांनी प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर, ‘गर्लफ्रेंड असताना अमिताभ बच्चन रोमाँटिक होते का?’ असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर जया बच्चन म्हणाल्या, ‘आम्ही जेव्हा एकमेकांना डेट करत होतो. तेव्हा आम्ही बोलायचो नाही. कधीतरी आमच्यामध्ये बोलणं व्हायचं.’ यावर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘रोमान्स म्हणजे फक्त वेळ वाया घालावणं आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं. लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात अनेत चढ-उतार आले पण दोघांनी देखील कधीच एकमेकांची साथ सोडली नाही. आता देखील अनेक ठिकाणी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र स्पॉट केलं जातं.

अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षी देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बॉलिवूडवर राज्य करत आहेत. पण कोणीही अमिताभ बच्चन यांची जागा घेतली नाही. जया बच्चन देखील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी जया बच्चन ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या होत्या. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमाई केली.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.