Video : के पॉप सिंगरवर चढला राम भक्तीचा रंग, Aoora ने गायलं रघुपति राघव राजा राम
इंस्टाग्रामवर म्युझिक व्हिडिओ शेअर करताना ऑराने लिहिले- दक्षिण कोरियाचे अयोध्येसोबत ऐतिहासिक नातं आहे. अयोध्येत जल्लोषाचे वातावरण आहे. म्हणूनच मी हे गाणे यूपी टुरिझमला प्रेम आणि आदराने समर्पित करू इच्छितो.

Ram Mandir : जय श्री राम… जय श्री राम… आज भारतातील प्रत्येक घराघरात फक्त जय श्री रामचा नारा दिला जात आहे. केवळ अयोध्या शहरातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात लोक प्रभू रामाचा जयजयकार करत आहेत. सर्व भक्त रामरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले आहेत. आय अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या खास दिनानिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. याच ऐतिहासिक दिवशी के-पॉप गायिका ऑरा याने त्याच्या आवाजातील एक गाणे प्रभू रामाला समर्पित केले आहे.
प्रभू श्रीरामांसाठी ऑराने गायलं गाणं
के-पॉप गायक ऑराने बिग बॉस 17 मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. पण त्याचा बिग बॉसमधील प्रवास काही आठवड्यांपूर्वीच संपला. ऑरा बिग बॉसच्या फिनालेच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तर त्याचा प्रभाव अद्यापही कायम आहे. त्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आता के-पॉप गायकाने राम ललासाठी गाणे गाऊन आपल्या चाहत्यांची मने आनंदित केली आहेत.
प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने ऑराने त्याच्या आवाजात प्रभू श्रीराम आणि उत्तर प्रदेश टूरिझमला समर्पित केलेला एक म्युझिक व्हिडिओ रिलीज केला आहे. म्युझिक व्हिडिओचे शीर्षक ‘रघुपती राघव राजा राम’ असे आहे. या व्हिडिओमध्ये के-पॉप सिंगर ऑरा हा पारंपारिक लूक मध्ये दिसत असून त्याने कळपाळावर नामही ओढला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रभू रामाचे गीत गाताना दिसत आहे. ऑरा याने रामललाच्या नावाचा अशा प्रकारे जप केला आहे की ते ऐकून श्रोतेही मंत्रमुग्ध होतील.
View this post on Instagram
साऊथ कोरियाचं अयोध्येशी कनेक्शन
ऑराने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा म्युझिक व्हिडिओ शेअर केला असून एक कॅप्शनही लिहीली आहेय. दक्षिण कोरियाचे अयोध्येसोबत खोल आणि ऐतिहासिक नाते आहे. अयोध्येत जल्लोषाचे वातावरण आहे. म्हणूनच मी हे गाणे यूपी टुरिझमला प्रेम आणि आदराने समर्पित करू इच्छितो. भारतीय संस्कृतीने मला भारताशी जोडण्याची संधी दिली आहे.