वॉशिंग्टन : मनोरंजन जगतात आपल्या सौंदर्याने धुमाकूळ घालणाऱ्या किम कार्दशियनची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तिच्या प्रत्येकाला तिच्यासारखं दिसायला आवडतं. तिच्या अनेक चाहत्या तर तिची कॉपीही करत असतात. त्यामुळे किम सारख्या महिलाही चर्चेत असतात. या तरुणींनाही जबरदस्त फॅन फॉलोइंग मिळते. अभिनेत्री आणि मॉडेल क्रिस्टिना एश्टन ही सुद्धा किम सारखीच दिसायची. तिला दुसरी किम कार्दशियन म्हणून ओळखलं जायचं. तिचा जलवाही भारी होता. पण या अभिनेत्रीला अधिक आयुष्य लाभलं नाही. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षीच तिने जगाचा निरोप घेतला आहे. क्रिस्टिनाच्या मृत्यूची बातमी येताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
क्रिस्टिना किम सारखी दिसायची. किमसारखीच तिची बॉडी फिगर होती. त्यामुळे दुसरी किम म्हणून चाहत्यांमध्ये ती लोकप्रिय होती. तिचे स्वत:चे फॅन फॉलोइंग तगडे होते. मात्र, वयाच्या 34 व्या वर्षी तिला कार्डियाक अरेस्ट आला आणि तिचं निधन झालं. 26 एप्रिल रोजी या अभिनेत्री आणि मॉडलचं निधन झालं. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या निधनाची बातमी दिली. ही बातमी आल्यानंतर क्रिस्टिनाच्या चाहत्यांमध्ये दु:खाची लाट पसरली. धक्कादायक म्हणजे मृत्यूपूर्वी काही तास आधीच क्रिस्टिनाने प्लास्टिक सर्जरी केली होती. या प्रक्रियेमुळेच तिचं निधन झालं असावं असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दिशेनेही तपास सुरू करण्यात आला आहे.
क्रिस्टिनाच्या निधनाबाबत तिच्या कुटुंबीयांनी निवेदन जारी केलं आहे. 20 एप्रिल रोजी आमच्याकडे दुखद बातमी आली. आमच्याच कुटुंबाच्या सदस्याने ही बातमी दिली होती. आमच्या कुटुंबाचा सदस्य किंचाळत आणि ओरडत होता. विव्हळत होता. शेवटी त्याने जे वाक्य उच्चारलं त्यामुळे आमच्या आयुष्यातील आनंद कायमचा हिरावला गेला आहे. एश्टन मरत आहे… मृत्यूच्या समीप जात आहे… हेच ते वाक्य होतं. हेच वाक्य आता आम्हाला आयुष्यभर भयभीत करणार आहे, असं क्रिस्टनच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
मेडिकल प्रोसिजरच्यावेळी क्रिस्टिनाची प्रकृती ढासळली होती. तिच्या कुटुंबांनीही ही माहिती कन्फर्म केली होती. आता क्रिस्टिनाचं निधन प्लास्टिक सर्जरीमुळेच झालं का? याचा तपास केला जात आहे. क्रिस्टिनाच्या निधनाने तिचे चाहतेही दुखात बुडाले आहेत. तिच्या निधनावर तिचे चाहते शोक व्यक्त करत आहेत. तू किती सुंदर होतीस. ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो, असं एका यूजर्सने लिहिलं आहे. क्रिस्टिना खूप चांगली होती. एखाद्या परीसारखी. रेस्ट इन पीस, असं दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे. तर तिच्या अनेक चाहत्यांनी सॅड इमोजी पोस्ट करून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.