‘कुमकुम’ मालिकेमुळे मिळाली लोकप्रियता, घटस्फोटानंतर कसं आयुष्य जगतेय जुही परमार?
Kumkum Fame actress Juhi Parmar: 'कुमकुम' मालिकेतील जुही परमारचं खडतर आयुष्य, मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली साथ, घटस्फोटानंतर कसं आयुष्य जगतेय अभिनेत्री? जुही सोशल मीडियावर कायम असते सक्रिय...
Kumkum Fame actress Juhi Parmar: ‘कुमकुम: एक प्यारा सा बंधन’ मालिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 2000 मध्ये सुरु झालेल्या मालिकेने अनेक वर्ष चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेत अभिनेत्री जुही परमार हिने मुख्य भूमिका साकराली होती. मालिकेमुळे जुहीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. जुहीने अनेक मालिकांमध्ये काम केलं. पण ‘कुमकुम’ मालिकेमुळे अभिनेत्रीच्या करियरला वेगळी दिशा मिळाली. आता अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सक्रिय असते.
जुही परमार हिने टीव्ही विश्वात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आणि यशाच्या शिखरावर पोहोचली. जुहीला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण अभिनेत्रीला खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला. घटस्फोटानंतर जुही मुलीचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करत आहे. तर अभिनेत्रीच्या नवऱ्याने दुसरा संसार थाटला आहे.
जुही परमार हिचं वैवाहिक आयुष्य
जुही परमार हिने 15 फेब्रुवारी 2009 मध्ये अभिनेता सचिन श्रॉफ याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. सचिन सध्या ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ मालिकेत तारक मेहताच्या भूमिकेला न्याय देत आहे. सांगायचं झालं तर, लग्नानंतर जुही आणि सचिन यांनी 2013 मध्ये मुलगी समायरा हिचं जगात स्वगत केलं. पण मुलीच्या जन्मानंतर काही वर्षांत दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
मुलीच्या जन्मानंतर 2018 मध्ये जुही आणि सचिन यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर काही महिन्यांत दोघांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. घटस्फोटानंतर मुलीच्या कस्टडी जुही परमार हिला मिळाली. तर सचिन याने दुसरं लग्न केलं. तर जुही हिने मुलीची जबाबदारी घेत दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.
‘बिग बॉस 5’ विजेती जुही परमार
बिग बॉस 5 सीझन 2012 मध्ये आला होता, ज्यामध्ये जुही हिने 14 स्पर्धकांसह घरात प्रवेश केला होता. शेवटपर्यंत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि ‘बिग बॉस 5’ शोटी ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. त्यानंतर जुही हिची लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
आता जुही लेक समायरा हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.