Madhuri Dixit | श्रीराम नेने नाही तर, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी असती माधुरी; का नाही होवू शकलं लग्न?
डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न करण्याआधी 'या' प्रसिद्ध क्रिकेटरला डेट करत होती अभिनेत्री माधुरी दीक्षित... नात्याचा झाला अत्यंत वाईट अंत...
मुंबई | 26 जुलै 2023 : ‘हम आपके है कोन..’, ‘दिल तो पागल हैं’, ‘देवदास’, ‘आजा नचले’, ‘साजन’, ‘कोयला’, ‘कलंक’, ‘बेटा’ अशा एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. माधुरी हिने फक्त तिच्या अभिनयाने नाही तर डान्सने देखील चाहत्यांच्या मनात घर केलं. दुसरीकडे माधुरीच्या सौंदर्यावर फक्त चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील फिदा होते. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आता माधुरी पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.
पण डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेत्रीचं नाव एका प्रसिद्ध क्रिकेटरसोबत जोडण्यात आलं. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीचं नाव क्रिकेटर अजय जडेजा यांच्यासोबत जोडण्यात आलं. पण दोघांची लव्हस्टोरी पूर्ण होवू शकली नाही. माधुरी आणि अजय यांची ओळख फिल्मफेअर फोटोशूट दरम्यान झाली. फोटोशूटसाठी दोघांनी रोमाँटिक पोज दिल्या होत्या.
फोटोशूटनंतर दोघांच्या नात्याची चर्चा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये देखील तुफान रंगू लागली. पण काही दिवसांनंतर दोघांमध्ये वाद होवू लगले. रिपोर्टनुसार, जेव्हा माधुरी दीक्षितने माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांना सिनेमात भूमिका मिळवून देण्यासाठी अनेक बॉलिवूड निर्मात्यांसोबत संपर्क केला होता.
अजय जडेजा यांच्या क्रिकेट कामगिरीत मोठे नकारात्मक बदल झाले. शिवाय त्यांचं नातं तुटण्यामागे कुटुंबिय असल्याचं देखील रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय जडेजा राजघराण्यातील होते. तर माधुरी ब्राह्मण मध्यमवर्गीय कुटुंबातली. म्हणून अजयच्या कुटुंबीयांना दोघांचं नातं मान्य नव्हतं. अशा परिस्थितीत माधुरी दीक्षितच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्या नात्याला विरोध केला. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
अजय यांच्यासोबत विभक्त झाल्यानंतर माधुरी हिने १९ ऑक्टोबर १९९९ साली डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. तर दुसरीकडे अजय जडेजा यांनी प्रसिद्ध राजकारणी जया जेटली यांची मुलगी आदिती जेटली यांच्यासोबत लग्न केलं. आता माधुरी आणि अजय देखील त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.