भक्तिमय आनंद करणार द्विगुणित, अनुप जलोटांच्या आवाजात ‘स्वामी दत्तगुरु’ भक्तांच्या भेटीस!
सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा (Anup Jalota) कायमच त्यांच्या धुरंदर आणि भावमय गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकतात. आजवर त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याची करावी तेवढी स्तुती कमीच आहे. आपल्या भावमय भक्तीगीतांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास अनुप जलोटा यांचे स्वामी दत्तगुरु हे गाणे आले आहे.
मुंबई : सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा (Anup Jalota) कायमच त्यांच्या धुरंदर आणि भावमय गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकतात. आजवर त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याची करावी तेवढी स्तुती कमीच आहे. आपल्या भावमय भक्तीगीतांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास अनुप जलोटा यांचे स्वामी दत्तगुरु हे गाणे आले आहे. हे दत्त भक्तीगीत हिंदीमध्ये असून, व्हिडीओद्वारे प्रसारित झाले आहे. दत्त जयंतीचे निमित्त साधून दत्त भक्तांसाठी ही एक अद्भुत पर्वणीच सदर करण्यात आली आहे.
आनंदी वास्तू आणि ऍक्ट प्लॅनेट प्रॉडक्शन निर्मित आणि प्रणव पिंपळकर दिग्दर्शित या गाण्यात सुप्रसिद्ध ज्योतिर्विद वास्तु तज्ञ आनंद पिंपळकर आणि अनुप जलोटा हे भूमिका साकारत आहेत. अभिनेता प्रणव पिंपळकरने दिग्दर्शित केलेले हे पहिले गाणे आहे.
वैमानिक अन् अभिनेताही!
वैमानिकाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे स्वप्न त्याने आवड म्हणून जोपासले. ‘आलंय माझ्या राशीला’, ‘ढिशक्याव’, ‘खुर्ची’ या आगामी चित्रपटातून तो लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. दत्त जयंतीचे औचित्य साधत ‘स्वामी दत्तगुरु’ हे गाणे 18 डिसेंबर रोजी हे गाणे ‘आनंद पिंपळकरस आनंदी वास्तू’ या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.
पाहा गाणे
‘आनंद पिंपळकरस आनंदी वास्तू’ या युट्युब चॅनेलवर विविध मंत्र व व्हिडीओ या आधी प्रसारीत करण्यात आले आहेत, शिवाय त्यांची ‘आई भवानी’, ‘जुनुन मेरा’ ही गाणी देखील प्रसिद्ध आहेत. या गाण्याला अनुप जलोटा यांनी गायले असून, या गाण्याला डॉक्टर संजय राज गौरीनंदन यांनी संगीत दिले आहे. तर या भक्तिमय गाण्याचे बोल अनिल राऊत यांचे आहेत. हे गीत ऐकता क्षणी एका वेगळ्याच विश्वात जाऊन ध्यानाचा आनंद प्रत्येक भक्त घेईल यांत शंकाच नाही.