हिरवा चेहरा, टक्कल, कवटी; बापरे या नीना गुप्ता आहेत? चुडैलच्या अवतारात यांना ओळखणंही कठीण

नीना गुप्ता यांचा गंजी चुडैलच्या रूपातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांना या अवतारात पाहून या नीना गुप्ता आहेत हेओळखणंच कठीण वाटतं. पण त्यांचा लूक नेटकऱ्यांना मात्र प्रचंड आवडला. सर्व नेटकऱ्यांनी त्यांच्या लूकला आणि त्यांनी या अवतारात केलेल्या अभिनयाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

हिरवा चेहरा, टक्कल, कवटी; बापरे या नीना गुप्ता आहेत? चुडैलच्या अवतारात यांना ओळखणंही कठीण
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 3:20 PM

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. मग त्या गोष्टी स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या असोत किंवा सोशल मीडियाद्वारे न पटणाऱ्या असो, प्रत्येक गोष्टींवर बेधडक बोलताना त्या दिसतात. आणि अगदी सहजतेने कोणतीही भूमिका वठवण्याबाबतही त्याचे नेहमीच कौतुक केले जाते. वयाच्या 65 वर्षीदेखील त्यांचा उत्साह हा तरुणाला लाजवेल असा असतो.

अशातच आता सोशल मीडियावर नीना गुप्ता यांची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध असणाऱ्या गंजी चुडेलचा अवतार चक्क त्यांनी घेतला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे. या व्हिडीओमध्ये असणारी ही गंजी चुडैल नीना गुप्ता आहे अजिबातच ओळखू येत नाहीये. त्यांनी अगदी हुबेहूब या चुडैलसारखं रुप घेतलेलं पाहायला मिळतं आहे.

गंजी चुडैलच्या अवतारात नीना गुप्ता

व्हिडीओमध्ये हिरवा चेहरा, टक्कल, हातात कवटी, चेहऱ्यावर जखमा अशा गंजी चुडैलच्या अवतारात नीना गुप्ता दिसत आहेत. तसेच यावेळी तिथे तीन युट्यूबर्सना बांधून ठेवण्यात आलेलं चित्रही दिसत आहे. नंतर त्या म्हणतात की, “मी आता या अवताराला थकले आहे. आता तुम्ही तिघी मला (बेब) तरुण बनवा”.तिघींनी नकार देताच नीना मस्करीमध्ये त्या तिघींचे युट्यूब अकाऊंट बंद करण्याची धमकी देतात.

नंतर तिघीजणी गंजी चुडेलला जेन-झी चु्डैल बनवण्यासाठी मदत करतात. आणि मग त्यानंतर नीना यांचा ग्लॅमरस लूक समोर येतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नीना गुप्ता यांना गंजी चुडैलच्या अवतारात पाहून नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंटस् दिल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “याला म्हणतात काहीही पुरावा मागे न ठेवणे #GenZChudail”.

चुडैलचा मेकओव्हर

खरंतर ही एक मेकअप प्रोडक्टसंदर्भातील एक जाहिरातीचा व्हिडीओ आहे. पण ती इतकी मजेशीर आहे की नेटकऱ्यांना ती फारच आवडली. नेटकऱ्यांनी या जाहिरातीवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

दरम्यान नीना यांची मुलगी मसाबा गुप्ता आणि तिचे पती सत्यदीप मिश्रा यांनी काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. मसाबा व सत्यदीप हे दोघे त्यांच्या पहिल्या बाळाच्या प्रतीक्षेत होते. नंतर या जोडप्याने आई-बाबा झाल्याची गुडन्यूज चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली होती.मसाबा व सत्यदीप यांनी त्यांना मुलगी झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. आयुष्याच्या या नव्या टप्प्यात पाऊल ठेवताना त्यांनी आपल्या मुलीची पहिली झलकही दाखवली. नीना यांनी आजी झाल्याचा आनंद झाला असल्याचेही सांगितले होते. नातीबरोबरचे अनेक फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.