Pathaan Movie Review : ‘पठाण’साठी मराठी चित्रपटांचा बळी देणार?
Pathaan Movie Review LIVE Updates in Marathi : बहुचर्चित पठाण चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते का? ते दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल.
मुंबई : शाहरुख खानची मुख्य भूमिका असेलला पठाण चित्रपट आज देश-विदेशात प्रदर्शित झाला. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला होता. पठाणमधील बेर्शम रंग गाणं आणि भगव्या बिकनीवरुन या वादाची सुरुवात झाली होती. काही संघटनांनी पठाण विरोधात आंदोलनाचे इशारे दिले होते. पण आज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत या चित्रपटाचे शो ज सुरु आहेत. शाहरुखच्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट महत्त्वाचा आहे. वाद आणि अन्य कारणांमुळे पठाणला रिलीज आधीच भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. Advance Booking मध्येच या चित्रपटाने बाजी मारली होती. आज पठाणबद्दल लेटेस्ट अपडेट्स काय आहेत ते जाणून घेऊया.
LIVE NEWS & UPDATES
-
येणाऱ्या काळात अनेक आश्चर्यकारक घटना आपल्याला पाहायला मिळतील; विखे पाटीलांचे सूचक वक्तव्य
अहमदनगर येणाऱ्या काळात अनेक आश्चर्यकारक घटना आपल्याला पाहायला मिळतील
काँग्रेस नेत्यांबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा सूचक वक्तव्य
काँग्रेसमध्ये देशात अस्वस्थता आहे
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेव्हा सुरू झाली त्यावेळी भारत जोडो पेक्षा काँग्रेस छोडो च काम सुरू झालं
अहमदनगर काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या राजीनामा नंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात याना टोला
काँग्रेसचा राजीनामा कोण देते काय देते माझ्या दृष्टीने फार त्याला महत्त्व नाही
-
राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन
MPSC अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आंदोलन
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट
लंके यांच्यासमोर मांडल्या विद्यार्थ्यांनी व्यथा
प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच
राहुरी कृषी विद्यापीठाशी संलग्न विद्यापीठांमधील शेकडो विद्यार्थ्यांचाही आंदोलनात सहभाग
-
-
अंबरनाथमध्ये रेल्वे अपघातातील जखमी तरुणीचा मृत्यू
तब्बल १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज
‘योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू!’
कुटुंबीयांचा रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
जखमी अवस्थेत ४५ मिनिटं प्लॅटफॉर्मवरच होती पडून
रेल्वे प्रशासनाने मात्र निष्काळजीपणाचे आरोप फेटाळले
-
डोंबिवलीत पठाण चित्रपटाला बजरंग दलाचा विरोध
डोंबिवली :
डोंबिवलीत पठाण चित्रपटाला बजरंग दलाचा विरोध
डोंबिवली पूर्वेतील मधुवन सिनेमागृहात पोहोचले बजरंग दल कार्यकर्ता
चित्रपट व्यवस्थापनाला केली चित्रपट रद्द करण्याची मागणी, नाहीतर चित्रपट बंद पाडणार
बजरंग दलाचे जिल्हा संयोजक करण उल्लीगल यांच्या इशारा
-
सोलापुरात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटला बजरंग दलाचा विरोध
– सोलापुरातील उमा चित्रपटगृहा बाहेर बजरंग दलाची घोषणाबाजी
– जय श्री रामच्या घोषणा देत पठाण चित्रपटाला केला विरोध
– चित्रपटगृह व्यवस्थापकाला निवेदन देत चित्रपट न दाखवण्याची केली विनंती
– पोलीस बंदोबस्तात सोलापुरातील सर्वच चित्रपटगृहात सुरु आहेत पठाण चित्रपटाचे शो
– सोलापुरात उमा चित्र मंदिर, इ स्क्वेअर, प्रभात, कार्णिवालमध्ये सुरु आहेत पठाण चित्रपटाचे शो
-
-
Live Update- औरंगाबादेत पठाण चित्रपटाच्या विरोधात बजरंग दल आक्रमक
औरंगाबाद शहरातील फेम तापडिया चित्रपट ग्रहावर बजरंग दलाचा हल्लाबोल
चित्रपटाच्या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्ते चित्रपट गृहाच्या बाहेर एकवटले
चित्रपटाचा शो बंद करण्याचा बजरंग दलाचा प्रयत्न
-
पठाण’वरून मनसेचा थिएटर मालकांना आंदोलनाचा इशारा
एकीकडे पठाणचे शोज हाऊसफुल असताना दुसरीकडे मनसेनं थिएटर मालकांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर….
Published On - Jan 25,2023 3:45 PM