तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनला रश्मिकाचा रूमर्ड बॉयफ्रेंडची घट्ट मिठी; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Dec 14, 2024 | 2:08 PM

अल्लू अर्जुनची जामिनावर सुटका झाल्यानंतर रश्मिका मंदानाचा रूमर्ड बॉयफ्रेंड आणि 'पुष्पा 2' दिग्दर्शक सुकुमार तसेच इतर सेलिब्रिटींनी भेट दिली. रश्मिकाच्या रूमर्ड बॉयफ्रेंडने अल्लू अर्जुनला पाहाताच त्याला घट्ट मिठीही मारली. सोशल मीडियावर या भेटीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनला रश्मिकाचा रूमर्ड बॉयफ्रेंडची घट्ट मिठी; व्हिडीओ व्हायरल
Follow us on

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या ‘पुष्पा’ 2 मुळे जेवढा चर्चेत होता त्यापेक्षा आता त्याला अटक झाल्यापासून तो जास्त चर्चेत आहे. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्याची सुटका झाल्यानंतर त्याच्या भेटीला अनेकजण गेल्याचं पाहायला मिळालं. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रश्मिकाचा रूमर्ड बॉयफ्रेंड अल्लू अर्जुनच्या भेटीला 

अल्लू अर्जुनला जामिन मिळाल्यानंतर श्रीवल्ली म्हणजेच रश्मिकाचा रूमर्ड बॉयफ्रेंड आणि ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी देखील अल्लू अर्जुनची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. रश्मिकाचा रूमर्ड बॉयफ्रेंड म्हणजे विजय देवरकोंडा याने अल्लू अर्जुनची हैदराबाद येथील त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. सोशल मीडियावर विजय आणि सुकुमार यांच्यासह इतर काही सेलिब्रिटींचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यावरून असे दिसून येत आहे की अल्लू अर्जुनची सुटका पाहून सर्वांनाच आ नंद झाला आहे.

विजय देवरकोंडा जेव्हा अल्लू अर्जुनला भेटला तेव्हा त्याने आनंदाने त्याला मिठीही मारली. मीडियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विजय देवराकोंडा त्याचा भाऊ आनंद देवराकोंडासोबत अल्लू अर्जुनला भेटायला त्याच्या घरी पोहोचले. विजयने निळ्या रंगाचा टी-शर्ट, काळी पँट आणि टोपी घातली होती. त्यांनी प्रथम अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांची भेट घेतली आणि त्यांना मिठी मारली. यानंतर विजयने अल्लू अर्जुनची भेट घेत त्यालाही मिठी मारली आणि अभिनंदन केले. यानंतर तिघांनीही बराच वेळी चर्चा करत एकत्र वेळ घालवलेला पाहायला मिळाला.

दिग्दर्शक सुकुमारही अल्लू अर्जुनला भेटले 

‘पुष्पा 2: द रुल’चे दिग्दर्शक सुकुमारही विजय आणि आनंद यांच्यासोबत होते. तसेच चित्रपटाचे निर्माते रवी आणि नवीन देखील त्यावेळी उपस्थित असेलेले पाहायला मिळाले. या भेटीत अर्जुन आणि सुकुमार एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहेत. यानंतर सुकुमारनेही अर्जुनला मिठी मारत त्याचे अभिनंदन केले आणि त्याचा हात धरून त्याला धीर देण्याचाही प्रयत्न केला..

‘कुटुंबासाठी कठीण काळ’, अल्लू अर्जुनकडून भावना व्यक्त

तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या अटकेबाबत मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि कायद्याचा आदर करतो. मी सदैव सहकार्य करीन आणि जे काही आवश्यक असेल ते करेन. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, मी महिलेच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. अर्जुन पुढे म्हणाला, ‘मी कायद्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा आदर करतो.’जेव्हा कायदा त्याचे काम करत असेल, तेव्हा मी या विषयावर भाष्य करू नये. आमच्या कुटुंबासाठी तो कठीण काळ होता.” असं म्हणत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.