‘डोन्ट वरी हो जायेगा’, संजय खापरेंचं नवीन नाटक रसिकांच्या भेटीला

| Updated on: Aug 13, 2022 | 8:22 AM

सकारात्मक भावना मनात आणली तर आपले काम सहज चांगले होऊ शकते. या मध्यवर्ती संकल्पनेवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या नाटकाचा विषय बेतला आहे.

‘डोन्ट वरी हो जायेगा’, संजय खापरेंचं नवीन नाटक रसिकांच्या भेटीला
संजय खापरेंचं नवीन नाटक रसिकांच्या भेटीला
Image Credit source: Tv9
Follow us on

मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता संजय खापरे (Sanjay Khapre) यांचा स्वत:चा असा अंदाज आहे. त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नाही. ‘डोन्ट वरी हो जायेगा’ (Don’t Worry Ho Jayega) हा त्यांचा कानमंत्र आहे. हाच कानमंत्र घेऊन रंगभूमीवर एक नाटक (Play) घेऊन ते सज्ज झाले आहेत. दिशा निर्मित आणि कलारंजना सादरकर्ते असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन संजय खापरे यांनी केले आहे. निर्माते प्रिया पाटील, नंदकिशोर पाटील, उदय साटम आहेत. या नाटकाचा प्रयोग 15 ऑगस्टला दुपारी 4.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली आणि 16 ऑगस्टला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे.

सकारात्मक भावना मनात आणली तर आपले काम सहज चांगले होऊ शकते. या मध्यवर्ती संकल्पनेवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या नाटकाचा विषय बेतला आहे. प्रत्येक खडतर परिस्थितीत स्वतःला समजवत राहायचं… ‘डोन्ट वरी हो जायेगा’ कारण जिंकण्याची पहिली पायरी एक छोटी आशा असते. या नाटकाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची धुरा संजय खापरे यांनी सांभाळली आहे. मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या संजय यांच्या सोबत या नाटकात सुपर्णा श्याम, रोहित मोहिते, आसावरी ऐवळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

याबद्दल बोलताना संजयजी सांगतात, “अभिनय–दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका मी या नाटकासाठी करीत असून दिग्दर्शक म्हणून माझं हे दुसरं नाटक आहे. परिस्थिती पुढे हात न टेकवता तिला सडेतोड उत्तर देतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. हा कानमंत्र यातून सांगितला आहे. हा आशय हलक्या-फुलक्या रीतीने मांडत मनोरंजनातून अंजन करण्यात आलं आहे. टेन्शन फ्री हे नाटक प्रेक्षक एन्जॉय करतील याची मला खात्री आहे.” राहुल पिंगळे यांची मूळ संकल्पना असून लेखन रोहित मोहिते आणि रोहित कोतेकर यांचे आहे. नेपथ्य महेश धालवलकर तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. गीत ललित युवराज तर संगीत मितेश चिंदरकर यांचे आहे.

हे सुद्धा वाचा