‘सारं काही तिच्यासाठी’मधील श्रीनूचा ‘रील स्टार’शी झाला साखरपुडा
अभिषेकने इतरही काही मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सन मराठी वाहिनीवरील 'माझी माणसं', झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकांमध्येही तो झळकला होता.
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत श्रीनूची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक गावकर याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयुष्याची नवी सुरुवात केली. अभिषेकने 'रील स्टार' सोनाली गुरवशी साखरपुडा केला.
2 / 5
हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर त्यांनी त्यांचं रिलेशनशिपसुद्धा जगजाहीर केलं होतं. आता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दोघांनी साखरपुडा करत आयुष्याची नवी सुरुवात केली. या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3 / 5
अभिषेक आणि सोनालीच्या साखरपुड्यातील एक खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगठी घातल्यानंतर सोनाली अभिषेकच्या पाया पडते. त्याचवेळी अभिषेकसुद्धा सोनालीच्या पाया पडतो. हे पाहून नेटकऱ्यांनीही दोघांचं कौतुक केलं. अभिषेक आणि सोनालीवर सर्वसामान्यांसोबतच टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
4 / 5
अभिषेक हा झी मराठी वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत श्रीनिवासची भूमिका साकारतोय. याआधी त्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत काम केलं होतं.
5 / 5
अभिषेक हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेता असून त्याची होणारी पत्नी सोनाली ही इन्स्टाग्राम रील स्टार आहे. इन्स्टाग्रामवर सोनालीचे अभिषेकहून अधिक फॉलोअर्स आहेत. डिजिटल क्रिएटर असणारी सोनाली तिच्या गमतीशीर व्हिडीओंमुळे व्हायरल झाली होती. इन्स्टाग्रामवर तिचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.