अडल्ट स्टार रिया बर्डे सोबत राज कुंद्राचं कनेक्शन? स्पष्टीकरण देत म्हणाला…

| Updated on: Sep 29, 2024 | 12:03 PM

Raj Kundra Reacts on alleged Connection with Riya Barde: अडल्ट स्टार रिया बर्डे सोबत राज कुंद्राचं कनेक्शन? शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याची होणार चौकशी? स्पष्टीकरण देत म्हणाला..., सध्या सर्वत्र राज कुंद्रा याच्या वक्तव्याची चर्चा...

अडल्ट स्टार रिया बर्डे सोबत राज कुंद्राचं कनेक्शन? स्पष्टीकरण देत म्हणाला...
Follow us on

अडल्ट सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख हिला ठाण्यातील उल्हासनगरमधून पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. रिया भारतात नाव बदलून राहत होती. रिया हिने बनावट कागदपत्रे वापरून भारतीय पासपोर्ट मिळवला आणि रिया भारतीय नसून बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. याप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. रिया बर्डे प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यांचं नाव देखील समोर आलं. यावर राज याने स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा म्हणाला, ‘माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या बातम्यांमुळे मी अत्यंत त्रासलो आहे. याठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे की, संबंधित महिलेला मी कधी भेटलो नाही आणि अशी कोणताही प्रॉडक्शन कंपनी माझ्या मालकी हक्काची नाही. ज्यासाठी या महिलेने काम केलं आहे. करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही. माझी प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी मला प्रकरणात रोवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मी माझा व्यवसाय प्रामाणिकपणे केला आहे आणि करत आहे. माझ्यावर होत असलेले खोटे आरोप मी सहन करणार नाही,’ असं देखील राज कुंद्रा म्हणाला.

राज कुंद्रा याच्या वकिलांचं वक्तव्य

राज कुंद्रा याचे वकील प्रशांत पाटील यांच्या वक्तव्यानुसार, ‘बनावट रिपोर्टमध्ये माझे क्लायंट शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा यांचं नाव आरोपीसोबत जोडलं जात आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. याठिकाणी फक्त माझ्या क्लायंटला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज कुंद्रा आणि आरोपीचा कोणताही संबंध नाही…’ असं देखील वकील म्हणाले आहेत.

एवढंच नाही तर, बदनामी करण्याच्या उद्देशाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाख केला जाईल… असं देखील राज कुंद्रा याचे वकील म्हणाले आहेत. सध्या सर्वत्र राज कुंद्रा आणि रिया बर्डे यांच्या कनेक्शनची चर्चा रंगली आहे. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत… असं देखील राज कुंद्रा आणि त्याच्या वकिलांना स्पष्ट केलं आहे.

राज कुंद्रावर झालेले आरोप

बांगलादेशी मॉडल रिया बर्डे हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये देखील काम केल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला तुरुंगवास भोगावा लागला होता.