मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी अद्याप सुरूच आहे. सीबीआय या प्रकरणातील प्रत्येक बाबींचा तपास करत आहे. सुशांतच्या मृत्यूचा दिशाच्या (Disha Salian) मृत्यूशी काही संबंध आहे का, याचाही तपास सीबीआय करत आहे. याच तपासासाठी सीबीआय अधिकाऱ्यांनी दिशाचा कथित प्रियकर रोहन राय (Rohan Rai) याच्या घरी धाड टाकली आहे.( Sushant singh death case cbi reached disha salian boyfriend Rohan Rai house)
सुशांत आणि दिशाच्या मृत्यू संदर्भात सीबीआयने दिशाच्या जवळच्या लोकांची चौकशी केली आहे. एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री सीबीआयच्या 5 अधिकाऱ्यांची टीम तिचा कथित प्रियकर रोहन रायच्या घरी पोहोचली होती. मात्र, यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
यापूर्वी, भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी सांगितले होते की, दिशा सालियन तिच्या पालकांसोबत राहत नव्हती, तर ती रोहन राय नावाच्या मुलासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये होती.
तसेच दिशा आणि रोहन या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस लग्न करण्याचा विचार करत होते, असा दावा देखील नितेश राणेंनी केला होता. ‘आश्चर्याची बाब म्हणजे, दिशाच्या मृत्यूनंतर आजपर्यंत कुठेही रोहन राय या व्यक्तीचे नाव ऐकण्यात आलेले नाही आणि दिशा सालियन प्रकरणाशी त्याचा नेमका काय संबंध आहे? तो समोर का येत नाही? ही आत्महत्या होती की घातपात? या प्रकरणाचे पुढे काय झाले?’, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. (Sushant singh death case cbi reached disha salian boyfriend Rohan Rai house)
नितेश राणे पुढे म्हणाले की, ‘रोहन राय समोरही येत नाहीय आणि दिशाने आत्महत्याच केल्याचा दावाही करत आहे. तो या प्रकरणातून पूर्णपणे गायब झाला आहे. आता सध्या तो कुठल्याच चर्चेत का नाहीय? योगायोग म्हणजे 9 जून रोजी रोहन राय आणि त्याचे मित्र दिशाच्या अंत्यदर्शनासाठी एकत्र आले होते. मात्र, दिशाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर मृत्यूची तारीख 11 जून नोंदवण्यात आली आहे. जर रोहन राय आणि त्याचे मित्र 9 जून रोजी दिशाच्या अंत्यसंस्कारात हजर झाले होते, तर पोस्टमार्टम रिपोर्टवर 11 जूनची तारीख का होती? हे सर्व रोहन रायबद्दल शंका निर्माण करणारे आहे’, असे ते म्हणाले होते.
(Sushant singh death case cbi reached disha salian boyfriend Rohan Rai house)
SC adjourns hearing of a plea seeking a court-monitored CBI probe into the death of #SushantSinghRajput‘s former manager, Disha Salian.
A Bench headed by CJI SA Bobde adjourned the matter as petitioner Vineet Dhanda’s counsel couldn’t be present for video-conferencing hearing. pic.twitter.com/3fK1iZNPp4
— ANI (@ANI) October 12, 2020