TMKOC : मालिकेतील कृष्णन अय्यर यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील कृष्णन अय्यर यांच्यावर दुखःचा डोंगर, अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, खास व्यक्तीच्या निधनामुळे अभिनेत्याचं मोठं नुकसान
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कृष्णन अय्यर (Krishnan Iyer) म्हणजेच अभिनेते तनुज महाशब्दे (Tanuj Mahashabde) यांच्यावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. तनुज महाशब्दे यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं आहे. त्यांच्या मोठ्या भावाचं नाव प्रविण महाशब्दे असं होतं. मोठ्या भावाच्या निधनामुळे तनुज महाशब्दे पूर्णपणे कोलमडले आहेत. तनुज महाशब्दे यांच्या भावाच्या निधनानंतर मालिकेतील कलाकार आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. तनुज महाशब्दे यांच्या भावाच्या निधानंतर टीव्ही विश्वामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भावाच्या निधनानंतर तनुज महाशब्दे प्रचंड दुःखी आहेत. भावाच्या निधनानंतर तनुज महाशब्दे यांच्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द देखील नाहीत. तनुज यांच्या म्हणण्यानुसार, टीव्ही विश्वात त्यांना जे यश मिळालं आहे, ते फक्त आणि फक्त त्यांच्या मोठ्या भावामुळे शक्य होतं.
मोठ्या भावाने प्रेरणा दिल्यामुळे तनुज महाशब्दे यांच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यामुळे भावाचं निधन तनुज महाशब्दे यांच्यासाठी मोठं नुकसान असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. खासदार महेंद्र सिंग सोलंकी यांनी देखील तनुज यांचे मोठे भाऊ प्रविण यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.
तनुज महाशब्दे गेल्या १४ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मालित तनुज यांनी कृष्णन अय्यर ही भूमिका साकारत प्रेक्षकांचं आजही मनोरंजन करत आहेत.