Uorfi Javed | रेस्टॉरंट मॅनेजरसोबत उर्फी जावेद हिचा वाद, अभिनेत्रीच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता
उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे. उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात. मात्र, याचा काही फरक हा उर्फी जावेद हिच्यावर पडत नाही.
मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. अनेकदा फॅशन क्वीन उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. अनेकजण उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे खडेबोल सुनावताना दिसतात. काही दिवसांपूर्वी तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट उर्फी जावेद हिच्या विरोधात पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. इतकेच नाही तर जिथे भेटेल तिथेच हाताखालून काढण्याची भाषा चित्रा वाघ यांनी केली. उर्फी जावेद देखील चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर देताना दिसली.
काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिला मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये येण्यास बंदी घालण्यात आलीये. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे ही बंदी घातल्याचा दावा उर्फी हिने केलाय. नुकताच उर्फी जावेद ही तिच्या नव्या अतरंगी लूकमध्ये दिसली. या नव्या लूकच्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही एका रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे दिसत आहे. या रेस्टॉरंटमध्ये तिला येण्यास मनाई केल्याचे दिसत आहे.
रेस्टॉरंटमध्ये येऊ दिले जात नसल्याने उर्फी जावेद हिचा संपात होताना दिसत आहे. यावेळी रेस्टॉरंटच्या मॅनेजरला भांडताना व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही दिसत आहे. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण उर्फी जावेद हिचे समर्थन करत आहेत तर काही जण रेस्टॉरंटच्या मालकाने योग्य निर्णय घेतल्याचे म्हणताना दिसत आहे.
जावेद हिच्या नव्या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. आपल्या कपड्यांमुळेच आपल्याला रेस्टॉरंटमध्ये येऊ दिले जात नसल्याचे उर्फी जावेद हिने म्हटले आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा नवा लूक अत्यंत हटके आहे. यापूर्वी कधीच उर्फी जावेद ही अशा लूकमध्ये दिसली नव्हती.
उर्फी जावेद ही काही दिवसांपूर्वी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला गेली होती. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले. एका फोटोमध्ये उर्फी जावेद ही बिकिनीवर दिसली होती. ईदच्या दिवशीही बिकिनीमधील फोटो शेअर केल्याने अनेकांनी उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावले होते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये.