मुंबई : टायगर श्रॉफ हा त्याच्या फिटनेसमुळे जोरदार चर्चेत राहतो. टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा सोशल मीडियावरही तेवढाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी कायमच टायगर श्रॉफ हा सोशल मीडियावर व्यायाम करतानाचे खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसतो. आपल्या बाॅडीवर टायगर श्रॉफ याने खूप जास्त मेहनत घेतलीये. टायगर श्रॉफ हा त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफ याचे नाव दिशा पटानी हिच्यासोबत जोडले गेले. इतकेच नाही तर अनेकदा हे एकसोबत स्पाॅट झाले.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे एकमेकांना काही दिवस डेट करताना दिसले. इतकेच नाही तर टायगर श्रॉफ याच्या कुटुंबियांसोबत देखील खास वेळ घालताना दिशा पटानी ही दिसली. मध्यंतरी काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, हे दोघे लवकरच साखरपुडा करणार आहेत. मात्र, त्यानंतर यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा या रंगताना दिसल्या.
दिशा पटानी एका माॅडेलला डेट करत असल्याचे सांगितले गेले. आता टायगर श्रॉफ हा त्याच्या आगामी गणपत या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. गणपत चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले. आता नुकताच टायगर श्रॉफ याच्या गणपत या चित्रपटाचे धमाकेदार असे टीझर रिलीज करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा टीझर चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसतंय.
टीझर व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ हा धमाकेदार लूकमध्ये दिसतोय. हा टीझर व्हिडीओने मोठा धुमाकूळ नक्कीच घातलाय. डायरेक्टर विकास बहल यांचा हा गणपत चित्रपट आहे. 1 मिनिट 45 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन यांची धमाकेदार अॅक्शन बघायला मिळतंय. चाहत्यांना हा टीझर व्हिडीओ जबरदस्त आवडलाय.
या चित्रपटात टायगर श्रॉफ हा एका बॉक्सरच्या भूमिकेत असल्याचे टीझर व्हिडीओमधून स्पष्ट होतंय. अगोदर हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र, निर्मात्यांनी काही मोठे बदल करून हा चित्रपट 20 आॅक्टोबरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. टायगर श्रॉफ याचा हा चित्रपट थिएटरमध्ये धमाका करताना दिसणार आहे.