यावर्षी ओटीटीवरील ‘पंचायत’पासून ‘सेक्टर ३६’पर्यंत हे शो टॉपवर, ठरले प्रेक्षकांची पहिली पसंती

यंदा नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने+ हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक भन्नाट शो पाहायला मिळत आहेत. या काही सीरिजने लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणते ओटीटी शो टॉपवर राहिले आहेत.

यावर्षी ओटीटीवरील 'पंचायत'पासून 'सेक्टर ३६'पर्यंत हे शो टॉपवर, ठरले प्रेक्षकांची पहिली पसंती
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 4:54 PM

आपण पाहिलंत तर अनेकजण आता मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मने बऱ्याचदा चांगल्या प्रतीचे शो रिलीज केले आहेत. तर या शोने अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण ओटीटीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या अनेक चित्रपट, वेब सिरीज, शो बघू शकतात. तसेच यावर दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या मालिका, शो, येत असतात. त्यातच या संदर्भात २०२४ मध्ये कोणते शो सर्वाधिक पाहिले गेले असून प्रेक्षकांनी पहिली पसंती दिली आहे ते जाणून घेऊयात.

1. पंचायत श्रेणी: विनोदी

ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द व्हायरल फीव्हर फॉर प्राइम व्हिडिओ’ने तयार केलेला पंचायत हा एक मजेदार आणि कॉमेडी हिंदी शो आहे. शहरात नोकरी न मिळाल्याने एका गावात पंचायत सचिव म्हणून काम करणाऱ्या एका अभियांत्रिकी पदवीधराची ही कहाणी आहे. या शो मध्ये जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता आणि इतर कलाकारांचा यात सहभाग दिसणार आहे.

2. लाइफ हिल गई श्रेणी: कॉमेडी-ड्रामा

तर ओटीटीवर लाइफ हिल गई या शोमध्ये पूर्णपणे कॉमेडी-ड्रामा असून यात दोन भावंडांची कथा आहे ज्यांना एका जुन्या हवेलीचे हॉटेलमध्ये रूपांतर करण्याचे काम दिले जाते. ज्यात तुम्हाला संपूर्ण शो मध्ये कॉमेडी पाहिला मिळणार आहे. दिव्येंदू, कुशा कपिला आणि मुक्ती मोहन या शो मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

3. पिल श्रेणी: मेडिकल थ्रिलर

मेडिकल थ्रिल असलेला पिल हा शो ओटीवर धुमाकूळ घालत आहे. कारण या शो मध्ये तुम्हाला भारतीय फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये चालणारे काळे सत्य उघडकीस आणत आहेत. रितेश देशमुख, पवन मल्होत्रा आणि अंशुल चौहान यांसारख्या कलाकारांनी महत्वाची भूमिका बजावत आहेत. या शोची निर्मिती राज कुमार गुप्ता यांनी केली आहे.

4. फ्रीडम एट मिडनाइट

श्रेणी: ऐतिहासिक ड्रामा

हा शो १९४७ च्या भारताच्या फाळणीच्या घटनांवर आधारित आहे. ‘फ्रीडम ॲट मिडनाइट’ या प्रसिद्ध पुस्तकापासून प्रेरणा घेऊन हा शो तयार करण्यात आलेला आहे.

5. गुल्लक श्रेणी: कौटुंबिक ड्रामा

गुल्लक हा चित्रपट मिश्रा कुटुंबाच्या रोजच्या घडणाऱ्या गमतीशीर कथांवर आधारित आहे. या मालिकेत जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता आणि हर्ष मयार मुख्य भूमिकेत आहेत. हा शो बघताना तुम्हाला कौटुंबिक ड्रामाचा अनुभव येणार आहे.

6. ग्यारह श्रेणी: फँटसी थ्रिलर

आपण सध्या कोरियन ड्रामाचे किती तरी फॅन आज आपल्या भारतात आहे. यातच हा शो कोरियन ड्रामा ‘सिग्नल’चे हिंदी रूपांतर करून प्रदर्शित करण्यात आलेला आहे. यात कृतिका कामरा, राघव जुयाल आणि धैर्य करवा यांसारखे कलाकार आहेत.

7. सनफ्लावर श्रेणी: ब्लॅक कॉमेडी

विकास बहल आणि राहुल सेनगुप्ता दिग्दर्शित हा शो एक कॉमेडी मर्डर मिस्ट्री आहे. यात सुनील ग्रोव्हर, रणवीर शौरी आणि आशिष विद्यार्थी यांसारखे हुशार कलाकार आहेत.

8. त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर वर्ग: ड्रामा

चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत अव्वल पण गुपचूप महिलांसाठी सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या त्रिभुवन मिश्राची ही मालिका आहे. या मालिकेत मानव कौल, तिलोत्तमा शोम आणि श्वेता बसू प्रसाद यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

9. शेखर होम वर्ग:क्राइम ड्रामा

तुम्हाला जर क्राइम ड्रामा बघायला आवडत असेल तर आर्थर कॉनन डॉयल यांच्या कथांचे भारतीय रूपांतर केलेला शेखर होम हा शो नक्की पहा. तर मेनन, रसिका दुग्गल आणि कीर्ती कुल्हारी यांसारखे कलाकार यात आहेत.

10. सेक्टर 36 श्रेणी: क्राइम थ्रिलर

हा शो 2006 च्या नोएडा सिरियल मर्डर प्रकरणावर आधारित आहे. विक्रांत मेस्सी आणि दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हे शो त्यांच्या अनोख्या कथानक, दमदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे चर्चेत राहिले आहेत. कॉमेडी, थ्रिलर किंवा ड्रामा बघायला आवडत असेल तर या वीकेंडला या शोजसोबत तुमचा विकेंड मजेत घालवा.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.