मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच उर्फी जावेद हिने एक खास फोटो शेअर केलाय, यामुळेच ती चर्चेत आहे. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये.
उर्फी जावेद हिने तिला अटक केल्याचा एक फेक व्हिडीओ तयार केला. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, अशाप्रकारचा फेक व्हिडीओ तयार करणे उर्फी जावेद हिच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळाले. या फेक व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत असल्याने मुंबई पोलिस अॅक्शनमध्ये आले.
थेट उर्फी जावेद हिच्यासोबत त्या व्हिडीओमध्ये खोट्या पोलिस अधिकारी झालेल्या महिलांविरोधातही गुन्हा दाखल केला. हेच नाही तर या व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेली गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे उर्फी जावेद फक्त मजा करताना दिसत आहे. तिचा फोटो तूफान चर्चेत आहे.
उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये आईस्क्रीम दिसत आहे. म्हणजेच काय तर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही उर्फी जावेद धमाल करताना दिसत आहे. उर्फी जावेद ही सतत चर्चेत असते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ती कायमच दिसते.
उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे फार जास्त कठीण आहे. उर्फी जावेद हिला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या मिळाल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिच्यावर अशा कोणत्याही धमक्यांचा फार काही परिणाम अजिबातच होत नाही. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. नेहमीच तिच्यावर टिका केली जाते.