Pushpa 2 फेम अभिनेत्याला एक दिवसांत जामीन मिळवून देणारे वकील कोण? तासाला लाखात फी, इंडस्ट्रीत खास कनेक्शन
Pushpa 2: The Rule: महिलेच्या मृत्यू प्रकरणी Pushpa 2 फेम अभिनेत्याला अटक, पण त्याला एक दिवसांत जामीन मिळवून देणारे वकील कोण? तासाला लाखात फी... झगमगत्या विश्वात खास ओळखी...
Pushpa 2: The Rule: 35 वर्षीय महिलेच्या मृत्यू प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली होती. 13 डिसेंबर रोजी दुपारी अभिनेत्याला अटक करण्यात आली. पण 14 डिसेंबर रोजी अभिनेत्याची जामीनावर सुटका देखील झाली. अभिनेत्याला एका दिवसांत जामीन मंजूर झाल्यानंतर एक नाव सतत चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे अल्लू अर्जुन यांच्या वकिलांचं… महिलेच्या मृत्यू प्रकरणी अटक झालेल्या अल्लू अर्जुन याला एका दिवसांत जामीन मिळवून देणारे वकील कोण आहे आणि त्यांची एका तासाची फी किती आहे? याबद्दल जाणून घेऊ…
काय आहे अल्लू अर्जुन याच्या वकिलांचं नाव…
अल्लू अर्जुन याच्या वकिलांचं नाव निरंजन रेड्डी असं आहे. त्यांचा जन्म 22 जुलै 1970 मध्ये झाला. सुप्रीम कोर्ट आणि National Company Law Appellate Tribunal मध्ये त्यांनी वकिली केली आहे. निरंजन रेड्डी 2022 पासून आंध्र प्रदेश राज्यातून राज्यसभेचे सदस्यही आहेत. एवढंच नाही तर, ते एक निर्माता देखील आहे, त्यांनी चार तेलुगू सिनेमे ‘क्षणम’ (2016), ‘गाझी’ (2017), ‘वाइल्ड डॉग’ (2021) आणि चिरंजीवीचा ‘आचार्य’ (2022) सिनेमांची निर्मिती केली आहे.
निरंजन रेड्डी यांचं शिक्षण
तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील निर्मल येथे जन्मलेले निरंजन रेड्डी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. मात्र, त्यांचे वडील विद्या सागर रेड्डी हे प्रसिद्ध वकील होते. निरंजन यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर उच्च शिक्षणासाठी हैदराबादला गेले. त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केलं आणि 1992 मध्ये पदवी प्राप्त केली.
निरंजन रेड्डी राज्यसभा खासदार
2022 मध्ये, ते YSRCP आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले. सध्या राज्यसभेच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारांच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. निरंजन रेड्डी जलशक्ती मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्य आहेत.
निरंजन रेड्डी यांची फी
निरंजन रेड्डी सिनेविश्वात देखील सक्रिय आहेत. अनेक सेलिब्रिटींसोबत त्यांचे खास कनेक्शन आहेत. आता अल्लू प्रकरणानंतर निरंजन रेड्डी यांच्या फीची देखील चर्चा रंगली आहे. अल्लू अर्जुनला जामीन मिळाल्यानंतर निरंजन रेड्डी सेलिब्रिटी वकील प्रसिद्ध होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निरंजन रेड्डी प्रति तास 5 लाख रुपये मानधन घेतात.
निरंजन रेड्डी यांच्यामुळे अल्लू अर्जुनला जामीन मंजूर
निरंजन रेड्डी यांच्या युक्तिवादामुळे अल्लू अर्जुनला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मिळाला आहे. नामपल्ली न्यायालयाने अभिनेत्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयात युक्तिवाद असताना वकिलाने आपला अनुभव वापरत अंतरिम जामीनाची मागणी केली. ज्यानंतर अभिनेत्याला जामीन मंजूर झाला. यादरम्यान अभिनेत्या देश न सोडण्याचे आदेश दिले आहेत.