स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

| Updated on: Nov 23, 2024 | 7:00 AM

गेल्या काही दिवसापासून तुम्ही पण तणावामध्ये राहत असाल किंवा वस्तू ठेवून विसरून जात असाल तर सर्वात पहिले तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. कारण तुमचा आहार मेंदूला ऍक्टिव्ह ठेवू शकतो.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन
boost memory
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपल्या मानसिक आरोग्यावर आणि स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतोय चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकांना लहान वयातच स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यासारख्या विशिष्ट पदार्थांमध्ये आढळणारी पोषक तत्वे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही पदार्थ अशी आहेत त्यामुळे तुमचा मेंदू तीक्ष्ण होईल. जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल

अक्रोड

अक्रोडला मेंदूचे अन्न म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड मेंदूच्या पेशींना निरोगी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. या व्यतिरिक्त अक्रोड मध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन ई मेंदूला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात.

ब्लूबेरीज

तुमचा मेंदू तेज करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ब्लूबेरीचा समावेश केला पाहिजे. यामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ते अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. ब्लूबेरी सुपर फूड म्हणून देखील ओळखले जाते. त्यात लोह, फायबर, फॅटी ॲसिड असते जे तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी केवळ स्वादिष्ट नाही तर अँटिऑक्सिडंट आणि आवश्यक जीवनसत्वाने समृद्ध आहे. हे अँटिऑक्सिडंट विशेषतः फ्लेव्होनॉइडस सुधारित स्मरणशक्ति सोबत जोडलेले आहे. स्ट्रॉबेरी मेंदूच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात आणि स्मरणशक्ती वाढवतात.

डार्क चॉकलेट

बहुतेक लोकांना चॉकलेट खायला आवडते चॉकलेट खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते हे तुम्हाला माहिती आहे. डार्क चॉकलेट मध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटिऑक्सिडंट असतात जे चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी प्रभावी असतात. याचे सेवन केल्याने मेंदू निरोगी राहतो.

कॉफी प्या

दररोज कॉफी पिल्याने तुमची स्मरणशक्ती चांगली होईल. कॉफी मध्ये दोन मुख्य घटक कैफिन आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात.कैफिन मनावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रभाव टाकतो त्यांचं सेवन केल्याने सतर्कता वाढते आणि मूड देखील चांगला राहतो. कैफिन स्मरणशक्ती वाढवते.