Weight loss Drinks | वजन कमी (Weight loss) करणे तसे सोपे आहे. एकदा तुम्ही ते मनापासून करायचे ठरवले तर सहज शक्य आहे. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि दैनंदिन जीवनात (proper diet, exercise and changes in lifestyle) काही बदल करणे महत्वाचे असते. इथे काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगण्यात आले आहे, जी झोपण्यापूर्वी घेतल्यास तुम्हाला फायदा होईल.
आरोग्य तज्ज्ञांनुसार, वजन कमी करण्यासाठी झोपेचा (sleep) एक पॅटर्नही महत्वाची भूमिका निभावतो. झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाता, काय पिता याचाही आरोग्यावर आणि वजनावर परिणम होतो. झोपण्यापूर्वी मद्यपान करू नये, असा सल्ला डॉक्टर देतात. तसेच झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफीही पिऊ नये, असे सांगितले जाते. त्याने शांत झोप लागण्यात अडथळा निर्माण होतो. पण काही हेल्दी ड्रिंक्समुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.
दालचिनीमध्ये मुबलक प्रमाणात ॲंटी-ऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीच्या चहाचे सेवन केल्यास वजन कमी होण्यात मदत होते. यामुळे शरीर डिटॉक्सीफाय होते. दालचिनीचा चहा बनवणे अतिशय सोपे आहे.
झोपण्यापूर्वी तुम्ही हळद घातलेले एक कप दूध पिऊ शकता. हळदीमध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. दुधामध्ये कॅल्शिअम असते. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे सर्दी- खोकला, कफ अशा समस्यांपासून संरक्षण होते. तसेच ते स्नायू तयार करण्यासाठीही मदत करते. हळदीच दूध प्यायल्याने चांगली झोप लागते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले एक कप दूध प्यावे.
मेथीच्या चहामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. हा चहा प्यायल्याने पचनसंस्थेचे कार्य सुरळीतपणे चालते व ती निरोगी राहते. मेथीचा चहा प्यायल्याने झपाट्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. त्यासाठी मेथीचे दाणे 2 ते 3 तास पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर ते पाणी गाळून घ्यावे व थोडे गरम करून त्याचे सेवन करावे.
वजन कमी करायचे असेल तर झोपण्यापूर्वी द्राक्षाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे वेगाने फॅट बर्न होते. द्राक्षांमध्ये मुबलक प्रमाणात ॲंटी-ऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते. द्राक्षाचा रस नियमितपणे प्यायल्यास काही दिवसातच लठ्ठपणाचा त्रास कमी होईल. द्राक्षाच्या रसामुळे चरबीही कमी होते.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )