नवी दिल्ली – पार्टी असो किंवा मित्रांसोबत मजा करायची असो, तरुणाईसह आजकाल अनेक लोक डाएट कोक (diet coke) आणि कमी कॅलरी असलेली इतर पेयं पिण्यास प्राधान्य देतात. बहुतेक लोकांना असं वाटतं की डाएट किंवा फिजी ड्रिंक्स (cold drinks) हा एक हेल्दी पर्याय असू शकतो. मात्र हे खरं नाहीये. ही पेय गोड बनवण्यासाठी जास्त प्रमाणात साखर (sugar) वापरली जाते. अनेक डाएट ड्रिंक्समध्ये इतर स्वीटनर्सचा वापर केला जातो. त्यामध्ये साखरेपेक्षा कमी कॅलरीज असतात,पण हेही आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की, ही कमी कॅलरीज असलेली पेय वजन वाढण्यास आणि मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकतात.
या पेयांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया.
दात
बहुतांश फिजी ड्रिंक्समध्ये सायट्रिक ॲसिड असते, ज्यामुळे दातांच्या एनॅमलचे नुकसान होऊ शकते. तसेच क्लासिक फिजी ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे दात कमकुवत होतात व ते किडू शकतात. या ड्रिंक्समध्ये ॲसिड आणि फूड कलरचा समावेश असतो ज्यामुळे दात खराब होऊ शकतात. विशेषतः डार्क अथवा गडद रंगाचे फिजी ड्रिंक्स धोकादायक असतात.
लठ्ठपणा
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कृत्रिम गोड पदार्थांमुळे वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. डाएट कोक, डाएट पेप्सी आणि इतर पेयांमध्ये आढळणाऱ्या सुक्रोलोजमुळे महिला आणि जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये अन्नाची लालसा आणि भूक वाढू शकते. ही ड्रिंक्स प्यायल्याने भूक वाढू शकते, ज्यामुळे जास्त कॅलरींचे सेवन केले जाऊ शकते.
मधुमेह
दिवसातून केवळ दोन ( शीतपेय) प्यायल्याने टाइप-2 मधुमेहाचा धोका दुप्पटीने वाढतो. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की डाएट कोक किंवा कमी कॅलरी असलेली पेय प्यायल्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते. जे लोक दिवसातून 5 सर्व्हिंग्स म्हणजेच एक लिटर शीतपेय पितात, त्यांना टाइप-2 मधुमेह होण्याची शक्यता 10 पटीने वाढते.
स्ट्रोक
दररोज एका कॅनपेक्षा कमी फिजी ड्रिंक प्यायल्यास हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. लाखो लोक दररोज याचे सेवन करतात. त्यामुळे जगभरात मधुमेह आणि हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचा मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.
फिजी ड्रिंक्सचे जास्त सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. या पेयांमध्येही तेवढ्याच प्रमाणात कॅलरीज असतात, त्यामुळे त्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरते.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)