मुंबई : पूर्वीच्या तुलनेत मशरूम (mushroom) खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. मशरूम अनेक लोकांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. मशरूममध्ये अनेक पौष्टिक घटक असले तरी त्याचे सेवन काही प्रमाणात आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक (Harmful) मानले जाते. आकाश हेल्थकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. अनुजा गौर यांच्या मते, मशरूम अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. मशरूम व्हिटॅमिन डी चा एक चांगला स्रोत मानला जातो. कारण याच्या सेवनाने अनेक आरोग्य फायदे मिळतात. मशरूम मुळे, हाडे मजबूत होतात आणि कॅन्सरविरोधी गुणधर्मामुळे (anti-cancer properties) कर्करोगातही याचे सेवन फायदेशीर ठरते. पण यामुळे मृत्यूही होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? बाजारात अनेक प्रकारचे मशरूम आहेत. त्यापैकी सुमारे 12 ते 15 हानिकारक आहेत. यातील सर्वात हानीकारक डेथ कॅप मानली जाते. चमकदार रंगाची मशरूम सर्वात विषारी मानली जाते. म्हणून, पुढच्या वेळी मशरूम घेण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि फायदेशीर मशरूम निवडण्याची काळजी घ्यावी लागेल.
मशरूम बनवण्यापूर्वी ते व्यवस्थित धुवा. चांगले शिजवा आणि खा. जर तुम्ही चुकीच्या प्रकारची मशरूम खात असाल किंवा जास्त प्रमाणात खात असाल तर, त्याचे अनेक दुष्परिणाम दिसू शकतात. पचनसंस्थेत काही समस्या निर्माण होऊ शकतात. कच्चा मशरूम जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरिरावर दुष्परिणाम होतात.
मशरूम खाल्ल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. उर्जेच्या पातळीत घट देखील जाणवू शकते. तुमच्या घरात खूप वेळा मशरूम तयार होत असेल, दररोज सेवन करत असाल तर असे करणे थांबवा.
जास्त प्रमाणात मशरूम खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. याचे सेवन केल्याने अतिसार, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. त्यामुळे याचे जास्त प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी चांगले नाही.
मशरूमचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने देखील त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर रॅशेस, जळजळ आणि रॅशेस होऊ शकतात. मशरूमच्या अतिसेवनामुळे त्वचेचे नुकसानही होऊ शकते.
मशरूमच्या सेवनामुळे अनेकांना थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. काहींना मशरूम सुट होत नाही. यामुळे तुम्हाला खूप अस्वस्थ वाटते. तुमची एनर्जी लेव्हलही कमी होते.
मशरूमचे जास्त सेवन केल्यानेही डोकेदुखी होऊ शकते. यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. त्यामुळे त्याचे जास्त सेवन करणे टाळा. मशरूमचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा.