Mood Swings: तुमचेही वारंवार होतात का मूड स्विंग ? दूर करण्यासाठी घ्या या उपायांची मदत

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मासिक पाळीच्या काळात महिला आणि मुलींमध्ये मूड स्विंग जास्त दिसून येतो. शरीरात एस्ट्रोजन हार्मोन अचानक वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे मूड स्विंगची समस्या उद्भवते.

Mood Swings: तुमचेही वारंवार होतात का मूड स्विंग ? दूर करण्यासाठी घ्या या उपायांची मदत
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 2:07 PM

नवी दिल्ली – एखाद्या व्यक्तीच्या मूडमध्ये अचानक मोठा बदल (mood change) होत असेल तर त्याला मूड स्विंग (mood swing) म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, मूड स्विंगमुळे, एखाद्या व्यक्तीच्या मूडमध्ये अचानक बदल होतो. अशा स्थितीत व्यक्ती एका क्षणी आनंदी असेल तर दुसऱ्या क्षणी अचानक दुःखी होते. बर्‍याच प्रकरणांमध्ये मूड स्विंग हे परिस्थितीजन्य असतात. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मूड बदलल्यामुळे संबंधित व्यक्तीमध्ये चिडचिडेपणा येऊ लागतो. त्यांची मन:स्थिती चांगली रहात नाही, त्यांना अस्वस्थ (uneasy feeling) वाटू लागते. अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाचाही अभाव असतो.

जर तुम्हालाही वारंवार मूड स्विंग होत असतील तर या सोप्या टिप्स फॉलो कराव्यात.

मूड स्विंगची लक्षणे

हे सुद्धा वाचा

– बेचैन वाटणे

– झोप न येणे

– घाबरल्यासारखे वाटणे

– आत्मविश्वास कमी होणे

– अस्वस्थ वाटणे

– भ्रम होणे

– उदास वाटणे

– थकवा जाणवणे

– चिडचिड होणे

मूड स्विंगची कारणे

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मासिक पाळीच्या काळात महिला आणि मुलींमध्ये मूड स्विंग जास्त दिसून येतो. शरीरात एस्ट्रोजन हार्मोन अचानक वाढल्यामुळे आणि कमी झाल्यामुळे मुलींमध्ये मूड स्विंगची समस्या उद्भवते. याशिवाय, गर्भधारणा, तणाव, हार्मोनल असंतुलन, रजोनिवृत्ती आणि भ्रम यामुळे देखील मूड स्विंग होतात.

कसा करावा बचाव

– मूड सतत बदलण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी डॉक्टर नियमित अंतराने चेहरा धुण्याची शिफारस करतात. यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. यामुळे मूड स्विंगमध्ये आराम मिळतो.

– मूड स्विंगवर मात करण्यासाठी डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्यास सांगतात. जर तुम्हाला मूड स्विंग्सचा त्रास होत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर रोज एक सफरचंद नक्की खावे.

– रोज पुरेशी झोप घ्यावी. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 8 तास झोपावे. यामुळे तुम्ही मानसिक रित्या शांत राहू शकता. तसेच दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्य़ावे, यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.