Be Alert | झपाट्याने वजन कमी होतंय? मग वेळीच सावध व्हा, असू शकतं ‘या’ गंभीर आजारांचं लक्षण!

| Updated on: Sep 09, 2021 | 2:57 PM

वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करतात. चांगला आहार आणि नियमित व्यायाम करून तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. पण, जर कोणत्याही उपायाशिवाय तुमचे वजन वेगाने कमी होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे.

Be Alert | झपाट्याने वजन कमी होतंय? मग वेळीच सावध व्हा, असू शकतं ‘या’ गंभीर आजारांचं लक्षण!
Weight Loss
Follow us on

मुंबई : वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करतात. चांगला आहार आणि नियमित व्यायाम करून तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. पण, जर कोणत्याही उपायाशिवाय तुमचे वजन वेगाने कमी होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे.

जर, तुमच्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय वजन आपोआप कमी होत असेल, तर त्याचे कारण जाणून घेणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या आणि त्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जलद गतीने वजन कमी होण्याची जुजबी कारणे काय असू शकतात, ते आपण जाणून घेऊया…

मधुमेह

शरीरातील, रक्तातील साखर वाढल्यामुळे मधुमेह हा आजार होतो. जर या आजारात साखरेवर नियंत्रण नसेल, तर तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. त्यामुळे रक्तातील साखरेची वेळेवर तपासणी करावी.

कोणताही जीवघेणा आजार

कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होते, जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकालीन आजाराने किंवा कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारामुळे ग्रस्त असते. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रस्त असते, तेव्हा त्याचे शरीर आतून खराब होऊ लागते, ज्यामुळे वजन कमी होते. या परिस्थितीत, सर्वप्रथम डॉक्टरांची भेट घ्या.

कमकुवत पाचन तंत्र

जर, तुमची पचनसंस्था कमकुवत असेल किंवा नीट काम करत नसेल, तर अन्न शरीरात नीट पचत नाही. म्हणूनच तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. अन्न पचत नसल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत, ज्यामुळे इतर रोगांचा धोका वाढतो.

थायरॉईड

जेव्हा थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा वजन झपाट्याने कमी होऊ लागते. या व्यतिरिक्त, जेव्हा थायरॉईड ग्रंथी कमकुवत होते, तेव्हा सदर व्यक्तीची तब्येत बिघडते आणि चयापचय देखील मंदावते.

ताण

तणावामुळेही वजन कमी होते. ताण आणि तणावामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. आपण मानसिकदृष्ट्या निरोगी नसल्यास, आपल्याला नीट भूक लागत नाही आणि इतर समस्या देखील वाढतात.

स्नायूंचा कमकुवतपणा

कमकुवत स्नायू किंवा स्नायूंच्या वस्तुमानाच्या कमतरतेमुळे वजन जलद गतीने कमी होते. स्नायू कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामागचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी आणि निदानातूनच कळू शकते.

वजन कमी करण्याचा सर्वोत्तम उपाय

मात्र, जर वाढलेले वजन कमी करू इच्छित आहात, तर आहारात जास्तीत-जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या घ्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी देखील हिरव्या भाज्या महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

Benefits Of Grapefruit : आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल ‘पपनस’, जाणून घ्या याचे महत्त्वपूर्ण फायदे…

Ginger Water Benefits : आल्याच्या पाण्याचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे, वाचा अधिक!