Health : ताप आला की अंघोळ करायला हवी की नाही? तज्ज्ञ काय सांगतात?
असे काही लोक असतात जे तापात अंघोळ करत नाहीत. पण तापात अंघोळ करणे चांगले की वाईट? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर आता आपण याचबाबत जाणून घेणार आहोत.
मुंबई : सध्या बदलत्या हवामानामुळे अनेक आजार निर्माण होताना दिसत आहेत. यामध्ये मग ताप, सर्दी, खोकला, डेंग्यू अशा अनेक आजारांची साथ पसरली आहे. तसेच बदलत्या वातावरणामुळे बहुतेक लोकांमध्ये तापाची साथ पसरताना दिसत आहे. तर लोक ताप आल्यानंतर स्वतःची काळजी घेतात, डॉक्टरांकडे जातात किंवा मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेतात, या सर्व गोष्टी ते करतातच. पण सोबत काही असे काही लोक असतात जे तापात अंघोळ करत नाहीत. पण तापात अंघोळ करणे चांगले की वाईट? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर आता आपण याचबाबत जाणून घेणार आहोत.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक व्हायरल तापाचे रुग्ण आढळतात. कारण हा ताप असा असतो जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. व्हायरल ताप आल्यानंतर तो ताप पुन्हा पुन्हा एका व्यक्तीला येऊ शकतो. तसेच ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांच्यामध्ये हा वायरल ताप झपाट्याने वाढतो. व्हायरल ताप लहान मुले, वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांच्यामध्ये हा संसर्गजन्य ताप पुन्हा येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा बदलत्या वातावरणामध्ये लोकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
ताप आल्यानंतर आंघोळ करावी की नाही?
ताप आल्यानंतर काही लोक आंघोळ करतात तर काही लोक आंघोळ करत नाही. तर तापात आंघोळ करू नये असं बहुतेक लोकांचं म्हणणं आहे. पण तापात आंघोळ कशी करावी किंवा आपली स्वतःची निगा कशी राखावी याबाबत माहिती असणे प्रत्येकाला गरजेचे आहे. तापामध्ये आपल्या शरीराची निगा राखणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ताप आल्यानंतर कोमट पाणी करून त्यामध्ये कापड भिजवून आपले शरीर स्वच्छ केले पाहिजे. त्यामुळे आपल्या शरीराला शरीराची स्वच्छता होते आणि मानसिक दृष्ट्या देखील आपल्याला बरे वाटते.
तसेच व्हायरल ताप आल्यानंतर प्रत्येकाने ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्यावा. तसेच काही लोक ताप आल्यानंतर घरीच औषध घेऊन तो बरा करण्याचा प्रयत्न करतात. पण तसे न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच ताप आल्यानंतर तुम्ही गरम पाणी, वाफ, आल्याचा चहा हे घेऊ शकता यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळण्यास मदत होईल.