russia-ukraine war | पुतिन महाविनाशकारी अणू बॉम्ब टाकणार? एका मोठ्या चाचणीमुळे मिळाले संकेत

| Updated on: Oct 06, 2023 | 12:48 PM

russia-ukraine war | अखेर रशियाने महाविनाशकारी ब्यूरवेस्टनिक बनवलय. रशियाने जी चाचणी केलीय, त्यातून ते अणवस्त्राच वापर करतील असं संकेत मिळतायत. टेस्टबद्दल पुतिन अधिकृतपणे अजून तोंडी काही बोललेले नाहीत.

russia-ukraine war | पुतिन महाविनाशकारी अणू बॉम्ब टाकणार? एका मोठ्या चाचणीमुळे मिळाले संकेत
russia-ukraine war
Follow us on

मॉस्को : रशियाने अणवस्त्र सज्ज क्रूज मिसाइलची टेस्ट केलीय. ही एक फायनल टेस्ट होती. या चाचणीसह रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेवर न्यूक्लियर हल्ल्याची तारीख निश्चित केलीय का? असा प्रश्न विचारला जातोय, व्हर्च्युअल आधुनिक शस्त्र बनवण्याच काम पूर्ण केलय, असं पुतिन काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. पुतिन यांनी 2018 सालीच ही घोषणा केली होती. ते या शस्त्राच्या मारक क्षमतेने खूपच प्रभावित झाले होते. अणवस्त्राने सज्ज क्रूज मिसाइल असल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे. हे क्षेपणास्त्र कुठेही हल्ला करुन मोठा विद्ध्वस घडवू शकतं. या क्रूज मिसाइलला ब्यूरवेस्टनिक नाव देण्यात आलय. ब्यूरवेस्टनिक मिसाइलवर याआधी अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालय. कारण याच्या यापूर्वीच्या काही टेस्ट फेल झाल्या होत्या. पाश्चिमात्य मीडियामध्ये यावरुन रशियावर खूप टीका झालीय.

टेस्टबद्दल पुतिन अधिकृतपणे अजून तोंडी काही बोललेले नाहीत. रशियन संरक्षण मंत्रालयाने सुद्धा क्रूज मिसाइलच्या टेस्टबद्दल काहीही मत व्यक्त केलेलं नाहीय. ब्लॅक सीवर झालेल्या एका बैठकीत व्लादिमीर पुतिन यांनी, रणनीतिक शस्त्र तयार केल्याची वाच्यता केली होती. ब्यूरवेस्टनिकची यशस्वी चाचणी झाल्याचे ते म्हणाले होते. ते एक ग्लोबल रेंज अणवस्त्र संपन्न क्रूज मिसाइल आहे. म्हणजे पुतिन या मिसाइलच्या मदतीने कुठेही जगात अणवस्त्र हल्ला करु शकतात.

रशियाकडे ‘सम्राट’ नावाच कुठलं शस्त्र?

आर्म्स कंट्रोल कॅम्पपेन ग्रुप न्यूक्लियर थ्रेट इनीशियेटिवनुसार, 2017 ते 2019 दरम्यान या क्रूज मिसाइलच्या सर्व 13 टेस्ट अपयशी ठरल्या होत्या. व्लादिमीर पुतिन यांच्याहातात लवकरच इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स असतील. ‘सम्राट’ नावाच्या एका बॅलेस्टिक मिसाइलच काम जवळपास पूर्ण झालय. न्यूक्लियर योजनांमध्ये कुठलाही बदल करत नसल्याच पुतिन यांनी स्पष्ट केलय. पुतिन आणि त्यांचं सैन्य कधीही अणवस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहे.