Israel vs Hezbolllah : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा इशारा धुडकावून इस्रायल एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

Israel vs Hezbolllah : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलला एक इशारा दिला आहे. पण इस्रायल हा इशारा धुडकावून एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. गाझा पट्टीत संघर्ष सुरु असताना इस्रायलने अनेकवेळा असच केलय. आता सुद्धा ते पुन्हा असच काहीतरी करण्याच्या तयारीत आहेत.

Israel vs Hezbolllah : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा इशारा धुडकावून इस्रायल एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
israel lebanon attack
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 3:11 PM

मागच्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हिज्बुल्लाहमध्ये सुरु असलेला संघर्ष भीषण युद्धामध्ये बदलण्याची चिन्ह आहेत. सुरुवातीला दोन्ही बाजूंकडून परस्परांवर मिसाइल आणि रॉकेट हल्ले झाले. मागच्या चार दिवसात इस्रायलने लेबनानमध्ये भीषण हवाई हल्ले करुन हिज्बुल्लाहच कंबरड मोडून टाकलं आहे. एअर स्ट्राइकनंतर इस्रायल आता ग्राऊंड Action च्या तयारीत आहे. इस्रायली सैन्याच्या प्रमुखांनी सैनिकांना लेबनानमध्ये ग्राऊंड ऑपरेशन्ससाठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. हिज्बुल्लाहवरील या मोठ्या हल्ल्यांमुळे शत्रुच्या प्रदेशातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांची मध्य पूर्वेत पूर्ण युद्ध सुरु करण्याविरोधात इशारा दिला आहे. 21 दिवसाच्या युद्धविरामावर चर्चा सुरु आहे. मात्र, इस्रायल अमेरिकेन अध्यक्षांचा इशारा धुडकावण्याच्या तयारीत आहे. बुधवारी 72 जणांचा मृत्यू झाला. 233 जखमी झाले. लेबनानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. इस्रायलने हिज्बुल्लाह विरोधातील हल्ले वाढवले आहेत. “तुम्हाला जेट विमानांचा आवाज ऐकू येईल. दिवसभर हल्ले सुरु आहेत. तुमच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आणि हिज्बुल्लाहला कमकुवत करण्यासाठी हे सर्व सुरु आहे” असे सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्जी हलेवी म्हणाले.

किती मृत्यू? किती हजार लोक विस्थापित?

मागच्या आठवड्यात पेजर आणि वॉकी-टॉकी ब्लास्ट झाले. त्यानंतर युद्धाचा दुसरा टप्पा सुरु होणार असल्याच संकेत इस्रायली सैन्याकडून देण्यात आले होते. आता तेच सुरु आहे. सोमवारपासून इस्रायली सैन्याने हिज्बुल्लाहच इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करायला सुरुवात केली. यात लेबनानमध्ये 600 पेक्षा जास्त मृत्यू झाले. संयुक्त राष्ट्राच्या आकड्यानुसार लेबनानमधून 90 हजार लोक विस्थापित झाले आहेत.

निम्मा रॉकेटसाठा नष्ट

इस्रायलने हिज्बुल्लाहची निम्मी सैन्य शक्ती संपवली आहे. IDF नुसार, तीन दिवसांपूर्वी हिज्बुल्लाहकडे 1 लाख 40 हजार रॉकेट आणि मिसाइलचा साठा होता. पण इस्रायलच्या विनाशक हल्ल्यात हिज्बुल्लाहचा निम्मा रॉकेट आणि मिसाइल साठा नष्ट झाला आहे

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.