वॉशिंग्टन : जर तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला तर तुमच्या डोक्यात जेफ बेजोस, एलन मस्क, बिल गेट्स, मुकेश अंबानी अशी नावं येतील. आधुनिक वर्तमान काळाचा विचार केला तर ही नावं सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आहेतही. मात्र, आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला तर याचं उत्तर सांगणं अनेकांना जमणार नाही. जगाच्या इतिहासात असा एक व्यक्ती होऊन गेलाय ज्याच्या संपत्तीची तुलना आत्ताच्या श्रीमंत लोकांशी केली तर हे सर्व त्यांच्यापुढे काहीच नाही असं वाटेल. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे (Know about richest person of history King Mansa Musa).
इतिहासकारांनी अनेक पुस्तकांमध्ये आजपर्यंतच्या या सर्वात श्रीमंत व्यक्तीविषयी दावे केलेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा व्यक्ती कोण आहे जो बिल गेट्स, जेफ बेजोस आणि अंबानीपेक्षा अनेक पटीने श्रीमंत होता. त्याचं नाव मनसा मूसा असं होतं. त्याचा जन्म 1280 मध्ये माली देशात झाला होता.
मनसा मूसा कोण होता?
मनसा मूसा माली साम्राज्याचा राजा होता. त्याचं आफ्रिकेतील जंगलांवर राज्य होतं. या राजाने जवळपास 1312 ते 1337 या काळात या भागावर राज्य केलं. येथूनच त्याने अब्जावधींची संपत्ती मिळवली. जर मनसा मूसा जिवंत असता तर तोच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला असता असंही बोललं जातं. 13 व्या शतकातील राजाचं संपूर्ण नाव मूसा कीटा प्रथम असं होतं. नंतर त्याला मनसा या नावाने संबोधलं गेलं. मनसा म्हणजे बादशाह.
मनसा मूसा त्या काळात मिठ आणि सोन्याचा व्यापार करायचा. त्या काळात इतर भागातून सोन्याची मागणी खूप वाढली होती. असं सांगितलं जातं की मूसा त्याच्या फिरत्या काफिल्यासोबत कित्येक किलो सोनं घेऊन फिरत असे. इतकंच नाही तर तो रस्त्यात लोकांना सोनंही वाटायचा.
मूसा किती संपत्तीचा मालक होता?
मनसा मूसाची संपत्तीचा हिशोब करणं तसं खूप कठिण काम आहे. मात्र, अनेक रिपोर्टमध्ये मनसा मूसाजवळ 4,00,000 मिलियन अमेरिकी डॉलर एवढी संपत्ती असल्याचं सांगितलं जातं. भारतीय रुपयांमध्ये तो त्या काळी 24615980000000 रुपयांचा म्हणजेच जवळपास अडीच लाख कोटी रुपयांचा मालक होता. म्हणूनच मानवी इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्याचं नाव सांगितलं जातं.
सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जॅकब फग्गर यांच्या नावाचाही दावा
अनेकांचा असाही दावा आहे की जॅकब फग्गर आज जिवंत असता तर तोच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला असता. जॅकबकडे त्या काळात आजचे 400 बिलियन यूएस डॉलर म्हणजे जवळपास 25 खरब रुपये होते. ग्रेग यांनी 2015 मध्ये ‘द रिचेस्ट मॅन हू एवर लिव्ड’मध्ये जॅकबला इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलंय.
हेही वाचा :
‘ती’ माझी सर्वात मोठी चूक होती : बिल गेट्स
50 टक्के भारतीयांची मिळून जेवढी संपत्ती, तेवढी केवळ 9 जणांकडे!
व्हिडीओ पाहा :