India-maldive row | आता कळेल, संकटात असलेल्या मालदीवने चीनकडे हात पसरले, पण….
India-maldive row | मालदीवने भारताशी पंगा घेऊन मोठी चूक केलीय. आता मालदीव संकटात सापडला आहे. जवळचा मित्र चीन मदतीला येईल या अपेक्षेवर ते आहेत. पण मालदीवच संकट येणाऱ्या दिवसात आणखी वाढू शकतं. मालदीवने वेळीच काळाची पावल ओळखण गरजेच आहे.
India-maldive row | मालदीववर परदेशी कर्ज प्रमाणापेक्षा जास्त वाढलय. मालदीववर जवळपास 4.038 अब्ज डॉलरच परदेशी कर्ज आहे. 2026 येईपर्यंत मालदीव मोठ्या कर्ज संकटात सापडण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी या संकटातून बाहेर येण्यासाठी चीन आणि टर्कीकडून मदत मागितली. पण दोघांपैकी एकही देश त्यांच्या मदतीसाठी पुढे येत नाहीय.
मालदीवच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मालदीवमध्ये सकल देशांतर्गत उत्पन्न 5.6 अब्ज डॉलर आहे. या हिशोबाने मालदीववरील कर्ज वाढलय. येणाऱ्या दिवसात मालदीव संकटात सापडू शकतो. भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मुइज्जू यांनी जवळचा मित्र चीनकडे मदत मागितली आहे. जेणेकरुन कर्जाचा बोजा कमी करता येईल. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, मालदीवने चीनसोबतच टर्कीकडूनही मदत मागितली आहे.
मालदीवर कर्ज किती?
मालदीववर 1.3 अब्ज डॉलरच चिनी कर्ज आहे. एकूण परदेशी कर्जाच्या हे प्रमाण 30 टक्के आहे. चिनी कर्जाचा बॉन्ड 2026 मध्ये मॅच्युर होणार आहे. मालदीवला परदेशी आर्थिक मदतीची गरज आहे. अन्यथा ते कर्ज संकटात सापडतील. पण सध्या चीन आणि टर्की दोन्ही देश मदतीसाठी पुढे येत नाहीयत.
किती देश कर्जाखाली?
चीन मालदीवमध्ये आपल्या महत्त्वकांक्षी बेल्ट एंड रोड इनिशिएटिव अंतर्गत मोठ्या इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर काम करतोय. यामुळेच मालदीववर चिनी कर्ज वाढत चालल आहे. चिनी प्रोजेक्टमुळेच पाकिस्तान, केनिया, टंजानिया सारखे अनेक देश कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेलेत. त्यामुळे चिनी प्रोजेक्टस मोठ्या संख्येने यावेत, अशी मालदीवच्या जनतेची इच्छा नाहीय. मुइज्जू यांनी आपल्या राजकीय फायद्यांसाठी चीन समर्थन आणि भारत विरोधी भूमिका स्वीकारलीय. एप्रिल महिन्यात मालदीवची संसद म्हणजेच मजलिसची निवडणूक आहे. म्हणूनच मुइज्जू आपल्या भारविरोधी भूमिकेवर ठाम आहेत.
राजकीय अस्तित्व भारत विरोधावर अवलंबून
मुइज्जू यांच राजकीय अस्तित्व भारत विरोधावर अवलंबून आहे. त्यामुळेच त्यांनी भारतीय सैनिकांना परत पाठवण्याची शपथ घेतली आहे. मोदी सरकारने भारतीय नौदलाला लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटाच्या बाजूला असलेल्या अगत्ती बेटावर हवाई पट्टीचा विस्तार करण्यास परवानगी दिली आहे. मिनिकॉय बेटावर नवीन एअर पोर्ट बनवला जातोय.