दुबईला जाणाऱ्या भारतीयांचा व्हिसा का होतोय कॅन्सल? प्रवाशांना आर्थिक फटका

दुबईला मोठ्या प्रमाणात भारतीय फिरायला जात असतात. दुबईला जगातील सर्वाधिक पर्यटक भेट देतात. ज्यामध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे. पण दुबईला जाणाऱ्या भारतीयांना व्हिसा मिळणे आता कठीण झाले आहे. कारण व्हिसा नाकारण्याचं प्रमाण वाढलं आहे. काय आहे या मागचं कारण जाणून घ्या.

दुबईला जाणाऱ्या भारतीयांचा व्हिसा का होतोय कॅन्सल? प्रवाशांना आर्थिक फटका
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 3:51 PM

दुबईला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण दुबईला जाणाऱ्या लोकांचा व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ज्या भारतीयांना दुबईला जायचे आहे त्यांनी आधी व्हिसा कन्फर्म झाल्यानंतरच पुढचं नियोजन करणं चांगलं ठरेल. अन्यथा तुम्हामा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. दुबईसाठी भारतीयांचा व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण दुबईने नवीन व्हिसा नियम जारी केले आहे. दुबईला जाण्यासाठी आता या कडक नियमांचं पालन करावे लागणार आहे. कागदपत्रे आणि आर्थिक आवश्यकतांमुळे छाननी वाढली आहे. त्यामुळे व्हिसा नाकारण्याचे प्रमाणही वाढलंय. दुबईसाठी प्रत्येक 100 व्हिसा अर्जांमागे पाच ते सहा अर्ज नाकारले जात आहेत.

दुबईकडून नवीन नियम लागू

UAE ने व्हिसाचा गैरवापर टाळण्यासाठी नियमात बदल केले आहेत. इमिग्रेशन कायद्यांचे पालन करावा म्हणून हे बदल करण्यात आले आहेत. या नियमांनुसार, अर्जदाराना आता ते जेथे थांबणार आहेत त्याचा पत्ता, रिटर्न तिकीट आणि बँक बॅलन्स यांची संपूर्ण माहिती कागदपत्रांसह सादर करावी लागणार आहेत. जे मित्र किंवा नातेवाईकांकडे जाणार आहेत त्यांना त्यांच्या होस्टकडून अतिरिक्त कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जसे की भाडे करार, UAE ID आणि निवास व्हिसा. त्यामुळे भारतीय प्रवाशांना आता दुबईला जाताना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बँक खात्यात किती रक्कम असावी

दुबईसाठी जर तुम्हाला व्हिसा हवा असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत याची देखील माहिती द्यावी लागणार आहे. नव्या नियमानुसार किमान रक्कम किती असावी याबाबत देखील मर्यादा ठेवण्यात आली आहे. तुम्ही दुबईला किती दिवस राहणार आहेत यावरुन ती रक्कम ठरवली जाणार आहे. जर तुम्ही दोन महिन्यांसाठी दुबईला जाणार आहात तर तुमच्या खात्यात 5,000 दिरहम आणि तीन महिन्यांसाठी जाणार आहात तर तुमच्या खात्यात 3,000 दिरहम आवश्यक आहेत.

प्रवाशांचे आर्थिक नुकसान

अनेक प्रकरणात सर्व कागदपत्र असताना देखील व्हिसा नाकारला गेल्याची तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे भारतीय प्रवाशांचे आणि ट्रॅव्हल एजंटचेही नुकसान होत आहे. ट्रॅव्हल एजंट्सने माहिती दिली आहे की, व्हिसा नाकारण्याचं प्रमाण अचानक वाढलं आहे. त्यामुळे केवळ व्हिसा शुल्कच नाही तर आधीच बुक केलेली विमान तिकिटे आणि हॉटेल बुकिंगचे पैसेही बुडत आहेत.

नवीन नियमांच्या आधी दुबई व्हिसा नाकारण्याचे प्रमाण केवळ एक ते दोन टक्के होते. पण नवीन नियम लागू झाल्यापासून दररोज 100 अर्जांपैकी किमान 5-6 व्हिसा नाकारले जात आहेत.

'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा.