संसदेत किती पैसे घेऊन जाऊ शकतात खासदार ? काय आहेत नियम ?
खासदार संसदेत किती पैसे घेऊन जाऊ शकतात? हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. त्याचं कारणही तसंच मोठं आहे. 6 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात सभागृहात गदारोळ झाला. खासदाराच्या सीटवर नोटांचे बंडल सापडल्याची माहिती खुद्द राज्यसभेच्या सभापतींनी सभागृहाला दिली. यानंतर खासदार संसदेत किती पैसे घेऊन जाऊ शकतो? हा प्रश्न चर्चेत आलाय. याचविषयी आज जाणून घ्या.
एक खासदार संसदेत किती पैसे घेऊन जाऊ शकतो? हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. कारण, 6 डिसेंबरला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी कामकाज सुरू होताच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ यांच्या वक्तव्यावर संसदेत जोरदार गदारोळ झाला. यानंतर एक खासदार संसदेत किती पैसे घेऊन जाऊ शकतो? हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. राज्यसभेचे सभापती असं नेमकं काय म्हणालेत ज्यामुळे हा गदारोळ झाला, हे आधी जाणून घेऊया.
6 डिसेंबरला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे दहाव्या दिवशीचे कामकाज सुरू होताच जगदीप धनखड़ यांच्या वक्तव्यावर संसदेत जोरदार गदारोळ सुरू झाला. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सीट क्रमांक 222 मधून नोटांचा गठ्ठा जप्त करण्यात आला, असे विधान राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी केले. यानंतर सुरु झालेला गदारोळ इतका वाढला की राज्यसभेच्या सभापतींनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. याच घटनेनंतर आता एखादा खासदार संसदेत किती पैसे घेऊन जाऊ शकतो? हा प्रश्न सध्या चर्चेत आला.
खासदार सभागृहात किती पैसे आणू शकतात?
खासदार सभागृहात किती पैसे आणू शकतात? याबाबत कोणतेही नियम-कायदे नाहीत. कोणताही खासदार हवे तेवढे पैसे घेऊन सभागृहात जाऊ शकतो. संसद भवनाच्या आत भोजनालये आणि बँका देखील आहेत. अनेक नेते या बँकेतून पैसे काढत असतात. अशा परिस्थितीत संसदेत नोटो घेऊन जाणे नियमांच्या विरोधात नाही.
मात्र सभागृहात मोठ्या रकमेचे प्रदर्शन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. संसदेच्या आत पैशांचा वापर किंवा ते दाखवल्यास संसदेची प्रतिष्ठा कमी होऊ शकते. 2008 मध्ये नियम अधिक कडकपणे लागू करण्यात आले.
वैयक्तिक सामानाबाबत काय नियम?
खासदारांना एक लहान पाकीट किंवा आवश्यक वैयक्तिक वस्तू असलेली बॅग यासारख्या वैयक्तिक वस्तू घेऊन जाण्याची परवानगी आहे. जोपर्यंत सभागृहाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत नाही. महिला खासदारांना हँडबॅग बाळगण्याची परवानगी आहे. पण त्याचा वापर केवळ खाजगी कामासाठी करण्याच्या अटीवर. पाकीट किंवा छोटी बॅग घेऊन जाण्यास कोणतेही बंधन नाही, परंतु यामुळे चालू असलेल्या कामकाजात व्यत्यय येणार नाही.
खासदार संसदेत काय नेऊ शकतात?
कागदपत्रे : विधिमंडळाच्या कामासाठी लागणारी कागदपत्रे घेऊन जाण्याची मुभा आहे.
स्पीच पेपर : चर्चेत भाग घेण्यासाठी तयार केलेला स्पीच पेपर.
इलेक्ट्रॉनिक वस्तू : पूर्वपरवानगीनंतर खासदारांना मोबाईल फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपसोबत बाळगता येतात.
स्नॅक्स : कामकाजादरम्यान पाणी आणि हलक्या स्नॅक्सला परवानगी आहे.
काय घेऊन जाण्यास मनाई?
अश्लिल किंवा अयोग्य मजकूर : सभागृहात किंवा कामकाजात आक्षेपार्ह वाटणारी कोणतीही गोष्ट घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.
प्रदर्शन साहित्य : निदर्शनांसाठी वापरण्यात येणारे फलक, पोस्टर्स किंवा बॅनर यासारख्या वस्तू संसदेच्या आत नेल्या जाऊ शकत नाहीत.
मोठ्या प्रमाणात रोकड : रोख रक्कम, विशेषत: मोठ्या रकमेचे बंडल घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.
अनधिकृत इलेक्ट्रॉनिक उपकरणे : परवानगीशिवाय छायाचित्रे रेकॉर्ड करण्यासाठी किंवा काढण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे संसदेच्या आत नेली जाऊ शकत नाहीत.