या व्यक्तीने केली होती आपल्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी; नावं ऐकून तुम्हाला चुटपूट लागेल
प्रसिद्ध भविष्यवेत्ता नास्त्रेदमसच्या भारताबाबतच्या भविष्यवाण्यांचा हा लेख आहे. त्यांच्या प्राचीन ग्रंथातील उल्लेख आणि आधुनिक संदर्भ यांचे विश्लेषण करून भारताच्या भविष्याबाबत त्यांच्या विचारांचा आढावा घेतला आहे. त्यांच्या अनेक भविष्यवाण्यांची चर्चा करून लेखात त्यांच्या अचूकतेचा विचार केला आहे. या लेखात नास्त्रेदमसच्या जीवनावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो हे सर्वज्ञात आहे. जगात कोणीही अमरत्वाचा पट्टा घालून आलेलं नाही. एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यू येतोच. फक्त एवढंच की काहींना लवकर मृत्यू येतो. तर काहींना उशिरा. आजपासून 500 वर्षापूर्वी एका अशा व्यक्तीचा जन्म झाला. त्याला भविष्य वर्तवता येत होतं. अनेकांचं आणि जगाचं अचूक भविष्य त्याने अचूक वर्तवलं होतं. नास्त्रेदमस असं या व्यक्तीचं नाव. तो डॉक्टर होता. पण लॅटीन, युनानी आणि हिब्रू भाषेवर त्याचं प्रभुत्त्व होतं. आपल्या काळातील तो महान भविष्यवेत्ता म्हणून प्रसिद्ध होता. त्याची भविष्यवाणी आज 500 वर्षानंतरही चर्चेचा विषय आहे. त्याने भारत आणि आशियाबाबतही भविष्यवाणी केली होती.
भारताबाबत त्याने काय म्हटलं?
फ्रेंच स्तंभलेखक फ्रँकोइस गॉटियर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याबाबत लिहिलं आहे. 16 व्या शतकातील महान भविष्यवेत्ता नास्त्रेदमसने हिटलर, इराक युद्ध आणि वॉल स्ट्रिट कोलॅप्सबाबत भविष्य वर्तवलं होतं हे अत्यंत कमी लोकांना माहीत आहे. त्यांनी भारताबाबतही काही भविष्यवाणी केली होती. त्याची ही भविष्यवाणी जुन्या फ्रेंच आणि लॅटिन भाषेत आहे. त्याने 2000 मध्ये त्सुनामी येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आशिया आणि इंडिजमध्ये धरणीकंप होईल, अशी भविष्यवाणी नास्त्रेदमसने केल्याचं गॉटियर म्हणतात. 2012मध्ये फ्रेंच स्कॉलर आणि नास्त्रेदमस तज्ज्ञ बँपरेल डे ला रोसफोकाल्ट यांनी 15 व्या शतकातील एक पांडू लिपी शोधली होती. त्यातील काही ओळी भारताला समर्पित आहे. गॉटियर याने तर काही नेत्यांच्या नावाचा उल्लेखही केला आहे.
आशियात 21 व्या शतकात महान नेत्याचा जन्म होईल, असं नास्त्रेदमसने म्हटलंय. आशियात धार्मिक कट्टरता अधिक होती. आजही तशीच आहे. त्यामुळे या नेत्याच्या नावाबाबतही सस्पेन्स आहे. नास्त्रेदमसच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी 9/11 वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्याची भविष्यवाणी केली होती.
सकाळी जिवंत राहणार नाही
नास्त्रेदमसने त्याच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती. काही संशोधकांनीही याबाबतचा दावा केला आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांनी आपण उद्या मरणार असल्याचं सांगितलं होतं. उद्याची सकाळ मी पाहणार नाही, असं ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्यांच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळले होते. टेबलवरच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी स्वत:बाबतची केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती.
2 जुलै 1566 रोजी मृत्यू
नास्त्रेदमस यांचा जन्म 14 डिसेंबर 1503मध्ये फ्रान्सच्या सेंट रेमी या गावी झाला होता. त्यांचं नाव मिशेल दि नास्त्रेदमस होतं. ते प्लेगच्या आजारावर उपचार करायचे. त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून भविष्यातील घटनांवर भाष्य केलं होतं. या महान भविष्यवेत्त्याने 2 जुलै 1566 रोजी जगाचा निरोप घेतला.