हॉटेलमधून दुपारी 12 वाजताच का करावं लागतं चेकआऊट ?

Hotel Checkout Rules: देशातील कोणत्याही हॉटेल्समध्ये तुम्ही कधीही चेक इन करू शकता असा नियम आहे पण चेकआउटची वेळ तुम्हाला दुपारी १२ वाजताचीच दिली जाते. पण असा नियम का ? असा प्रश्न आपल्या मनात अनेकदा येतो. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

हॉटेलमधून दुपारी 12 वाजताच का करावं लागतं चेकआऊट ?
हॉटेल चेक-आऊट
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 3:31 PM

कुठेही फिरायला जायचं ठरवलं की, त्या ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलची खोली बुक करणे हे पहिलं काम आपण करतो. यासोबतच त्या हॉटेलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत की नाही हेही नीट तपासून घेतो. हॉटेल महाग असो वा स्वस्त, प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट येते की आपण कधीही चेक इन करू शकतो पण चेकआउटची वेळ फक्त 12 वाजताचीच का? तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर चला त्याबद्दल जाणून घेऊया.

हॉटेलमध्ये तुम्ही कधीही एंट्री करू शकता, पण चेकआऊटची वेळ ही दुपारची 12 वाजताचीच असते. अनेक देशांच्या हॉटेलमध्ये याच नियमाचे पालन केलं जातं. जर त्या वेळेत चेकआऊट केलं नाही तर पुढच्या दिवशीचं भांडही भरावं लागतं. हॉटेलमध्ये चेकआउटची वेळ फक्त दुपारी 12 वाजताचीच का असते?

जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये रूम बुक करता तेव्हा तुमच्याकडून 24 तासांचे पैसे घेतले जातात. पण ती खोली तुम्हाला पूर्ण 24 तास वापरता येत नाही. तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता खोली रिकामी करण्यास सांगितले जाते. तुम्ही चेक इन करता तेव्हा काही फरक पडत नाही. त्यामुळे रात्री 11 वाजता खोली बुक केली तरी दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत खोली रिकामी करावी लागते. बहुतांश हॉटेलचा हा नियम असतो.

कस्टमरना सुविधा मिळायला हवी

हॉटेलशी संबंधित लोकांच्या मते, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्वच्छता. चेक आउटची वेळ बदलल्यास, साफसफाईच्या कामात अडचण येऊ शकते. कारण, 12 वाजण्याची वेळ अशी असते जेव्हा ग्राहक सहजपणे खोली सोडू शकतो. म्हणजे तो सकाळी आरामात जरी उठला तरी सहज आवरून तयार होऊ शकतो. त्यासाठी त्याला धावपळ करावी लागत नाही नाही आणि पुढील ग्राहकालाही स्वच्छ खोली मिळते.

मॅनेजमेंटलाही फायदा

कोणतेही काम मॅनेज करण्यासाठी नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश हॉटेल्समध्ये चेक आऊटची वेळ 12 वाजता ठेवण्यात आलेली असते. एका ठराविक वेळेवर साफसफाई केल्याने मॅनेजमेंटलाही अधिक फायदा होतो. ग्राहकांनी वेगवेगळ्या वेळी चेक आउट केल्यास, मॅनेजमेंटला अधिक कर्मचारी नियुक्त करावे लागतील.

कस्टमरचा फायदा

सुट्टीवर गेल्यावर लवकर उठणे कुणालाच आवडत नाही, त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी चेकआऊटची वेळ 12 वाजता ठेवण्यात आली आहे. जेणेकरून या वेळेपर्यंत तुम्ही आरामात उठू शकता, नीट आवरून तुमचे सामान बांधून सहज निघू शकता.

समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा.
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?.
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?.
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका.
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?.
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.