देशाचा विकास दर घसरला, जीडीपी 6 वर्षांमधील निच्चांकी पातळीवर

| Updated on: Nov 29, 2019 | 9:06 PM

आधीच मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला आता पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे (Economic slowdown of India).

देशाचा विकास दर घसरला, जीडीपी 6 वर्षांमधील निच्चांकी पातळीवर
Follow us on

नवी दिल्ली : आधीच मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला आता पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे (Economic slowdown of India). चालू आर्थिक वर्षाच्या (2019-20) दुसऱ्या तिमाहीत भारताच्या विकास दरात मोठी घट झाली (Economic slowdown of India). या तिमाहित जीडीपीचा विकास दर 4.5 टक्क्यांवर घसरला आहे. ही मागील जवळपास 6 वर्षांमधील कोणत्याही एका तिमाहीची सर्वात निच्चांकी घसरण आहे.

सप्टेंबरमध्ये सलग सहाव्यांदा तिमाहीच्या विकास दरात घसरण पाहायला मिळाली. आर्थिक वर्ष 2019 च्या पहिल्या तिमाहीत विकास दर 8 चक्के, दुसऱ्या तिमाहीत 7 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.8 टक्के होता. या व्यतिरिक्त आर्थिक वर्ष 2020 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी घसरुन 5 टक्क्यांवर आला.

दरम्यान, उद्योगांची आकडेवारी देखील जाहीर झाली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार मागील एका वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रमुख क्षेत्रांमध्ये (कोअर सेक्‍टर) 5.8 टक्क्यांची घट झाली. कोर सेक्‍टरमध्ये कोळसा, क्रूड, ऑईल, नैसर्गिक गॅस, रिफायनरी प्रोडक्ट्स, फर्टिलायजर्स, स्टील, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटी या 8 प्रमुख उद्योगांचा समावेश होतो.

कर उत्पन्नातही सरकारला मोठं अपयश

सरकारला महसुल उत्पादनाच्या आघाडीवरही मोठा झटका बसला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या आधी 7 महिने (एप्रिल ते ऑक्टोबर) सरकारी तिजोरीचा तोटा अपेक्षित तोट्यापेक्षा अधिक 7.2 ट्रिलियन रुपये (100.32 अरब डॉलर) राहिला. दुसरीकडे एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान सरकारला 6.83 ट्रिलियन रुपये कर मिळाला. मात्र, याच काळातील खर्च 16.55 ट्रिलियन रुपये राहिला.

याआधी मार्च 2013 मध्ये तिमाहीत देशाचा जीडीपी दर असाच घसरला होता. चालू आर्थिक वर्षाच्या (2019-20) पहिल्या तिमाहीत जीडीपी विकास दर 5 टक्क्यांवर होता. याप्रमाणे केवळ मागील 3 महिन्यांमध्ये जीडीपीचा दर 0.5 टक्क्यांनी घसरला आहे.