औरंगाबाद : जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पत्रात 94 हजार 320 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे (Jayakwadi Dam 94 thousand Cusec Water Dischanged). जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे 2 ते 4 फुटाने उघडून विसर्ग सुरु आहे. धरणाचे 10 ते 27 दरवाजे चार फुटाने उघडले, तर 1 ते 9 दरवाजे दोन फुटाने उघडले. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास 94 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे (Jayakwadi Dam 94 thousand Cusec Water Dischanged).
सध्या धरणातून 10 ते 27 दरवाज्यातून 75 हजार 456 क्युसेक आणि 1 ते 9 दरवाजे हे आपत्कालीन असून ते दोन फूट उंचीपर्यंत उचलण्यात आलेले आहेत. त्यामधून 18 हजार 864 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. असा एकूण 94 हजार 320 क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे
जायकवाडी धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने गोदावरी नदीला तुफान पूर आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदाच जायकवाडी धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर गोदावरी नदी काठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना प्रचंड सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरामुळे औरंगाबादसह जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये याचा परिणाम जाणवणार आहे.
जायकवाडी धरणात सध्या एकूण पाणीसाठा 2897.100 दलघमी असून त्याची एकूण टक्केवारी 99.44 टक्के इतकी आहे. तर धरणातील जिवंत पाणीसाठा 2158.994 दलघमी इतका आहे.
जायकवाडीतून काल रात्री 10 वाजून 30 वाजेच्या सुमारास 47000 क्युसेक विसर्ग सुरु होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिसर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला होता. नागरीकांनी त्यांची चल, अचल मालमत्ता गोदापात्रातून काढुन घ्यावी, कोणीही नदीपात्रात जाऊ नये, नदीकाठावरील गावांतील नागरीकांनी सतर्कता बाळगावी. जेणे करुन कोणतीही जीवीत, वित्तहानी होणार नाही, अशा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या.
गरज पडल्यास जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग 1 लाख क्युसेक होण्याची शक्यता आहे, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी ही माहिती दिली.
जायकवाडी धरणातून 50 हजार क्यूसेक पेक्षाही अधिकचा विसर्ग, गोदाकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशाराhttps://t.co/WwtLy9byqL#JayakwadiDam #GodavariRiver #Flood
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 17, 2020
Jayakwadi Dam 94 thousand Cusec Water Dischanged
संबंधित बातम्या :