पहिल्या दिवसापासून सगळ्यांची मेहनत, अखेर केडीएमसीत रुग्णसंख्या कमी : खासदार श्रीकांत शिंदे

| Updated on: Nov 03, 2020 | 7:41 PM

केडीएमसी क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात प्रशासनाला यश आलं आहे (MP Shrikant Shinde on KDMC Corona situation).

पहिल्या दिवसापासून सगळ्यांची मेहनत, अखेर केडीएमसीत रुग्णसंख्या कमी : खासदार श्रीकांत शिंदे
Follow us on

ठाणे : “केडीएमसीत कोरोनाचं संक्रमन झाल्यापासून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष देऊन डॉक्टरांची मोठी टीम उभी केली. केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी आणि महापौर विनिता राणे यांनी वारंवार मेहनत घेऊन कोरोनायोद्धे नर्सेस, डॉक्टर यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळेच कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे”, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली (MP Shrikant Shinde on KDMC Corona situation).

कल्याणमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात श्रीकांत शिंदे बोलत होते. “पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी मेहनत घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबविली गेली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं गेलं. त्यामुळे आज कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले (MP Shrikant Shinde on KDMC Corona situation).

“कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झाला तेव्हापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठी होती. महापालिका हद्दीत पहिल्या दिवसापासून कोरोना प्रादूर्भाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष दिले. तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर विनिता राणे यांच्यासह नगरसेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे कोरोना रुग्णांची संख्या आज कमी झाली आहे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. कल्याण-डोंबिवली शहर तर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलं होतं. केडीएमसीत आतापर्यंत 50 हजार रुग्ण आढळले. यापैकी 10 हजार 9 रुग्णांचा आतापर्यंत दुर्देवी मृत्यू झाला. तर 47 हजार 945 रुग्ण बरे झाले आहेत. केडीएमसीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

हेही वाचा : ‘शेवटचं निवेदन देतोय, स्कायवॉकवरील घाणीचं साम्राज्य हटवा’, मनसेचा केडीएमसीला इशारा