‘ऑनलाईन चोरी’, टेक्नोसॅव्ही चोरटे गजाआड

सातारा : आज आपण सर्व व्यवहार ऑनलाईन करतो. पण एखाद्या गोष्टीचा जेवढा वापर वाढतो, तेवढा त्या संबंधीत गुन्ह्यांमध्येही वाढ होते. ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शनच्या बाबतीतही असचं घडत आहे. पगारापासून ते हॉटेलच्या बिलापर्यंत आज आपण सर्व व्यवहार ऑनलाईन करतो. त्यामुळे यासंबंधीच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. सातारा येथे अशाच एका ऑनलाई फ्रॉड करणाऱ्या टोळीचा झडा पोलिसांनी लावला आहे. सातारा […]

‘ऑनलाईन चोरी’, टेक्नोसॅव्ही चोरटे गजाआड
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 12:31 PM

सातारा : आज आपण सर्व व्यवहार ऑनलाईन करतो. पण एखाद्या गोष्टीचा जेवढा वापर वाढतो, तेवढा त्या संबंधीत गुन्ह्यांमध्येही वाढ होते. ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शनच्या बाबतीतही असचं घडत आहे. पगारापासून ते हॉटेलच्या बिलापर्यंत आज आपण सर्व व्यवहार ऑनलाईन करतो. त्यामुळे यासंबंधीच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. सातारा येथे अशाच एका ऑनलाई फ्रॉड करणाऱ्या टोळीचा झडा पोलिसांनी लावला आहे. सातारा येथे ऑनलाईन पध्दतीने पेट्रोलपंप, हॉटेलात फसवणूक करुन स्वत:च्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणाऱ्या टोळीला पकडण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. कोरेगाव तालूक्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वामी पेट्रोल पंपावर एक कार पेट्रोल भरण्यासाठी आली, सहा हजार रुपयांचे पेट्रोल त्या गाडीत भरण्यात आले. त्यावर गाडीतील संशयीतांनी ऑनलाईन पैसे भरले. पण ते पैसे पंपाच्या खात्यात जमा झालेच नाहीत. ही बाब लक्षात येताच पंप कर्मचाऱ्यांनी वाठार पोलिसांकडे घटनेची तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य बघता मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन वाठार पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या टोळीने अशाप्रकारे आजवर सातारा, पुणे जित्ह्यातील लोणंद, फलटण, बारामती जेजूरी परीसरात एटीएमव्दारे ऑनलाईन गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली. गुन्ह्यातील सर्व आरोपी हे नाशिक आणि जळगावातील आहेत. विजय सुर्यवंशी, योगेश काळे, निलेश ब्राम्हण-भिडे, अस्पाक शेख, देवीदास शिंदे, लक्ष्मीकांत पाटील अशी त्यांची नावे आहेत.  संशयिताकडून एसबीआय, युनियन बँक तसेच कॉर्पोरेशन बँकेचे एमटीम कार्ड आणि 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. यासर्वांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले, न्यायालयाने सर्व आरेपींना पोलीस कोठडी सुणावली.  मात्र चोरी करण्याची अनोखी ऑनलाईन पद्धत खूप नुकसान दायक ठरु शकते. त्यामुळे पोलीस या टोळीची कसून चौकशी करत आहेत. तसेच अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यांवर कसा आळा बसू शकेल यासाठीही पोलीस प्रयत्न करत आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.