खजूर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. थंडीच्या काळात हे ड्रायफ्रूट खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. यामध्ये लोह खनिजे कॅल्शियम अमिनो ॲसिड फॉस्फरस आणि जीवनसत्वे असे अनेक गुणधर्म आढळतात. जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. खजूरचा आहारात अनेक प्रकारे समावेश करता येतो. दुधासोबत खजूर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मजबूत रोगप्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणापासून वाचवण्यास मदत करते. जाणून घेऊया खजूर खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आहारात खजूर समाविष्ट करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे लाडू आहे. खजुरा पासून बनवलेले लाडू एक ग्लास दुधासोबतही खाऊ शकता. ज्या लोकांचे वजन कमी आहे त्यांनी हे लाडू खाल्ल्यास त्यांना वजन वाढण्यास देखील मदत होईल.
खजुरा पासून खीर बनवू शकतात. खजुराची खीर चवीला खूप स्वादिष्ट लागते. ही कमी वेळात सहज बनवता येते. खजूर 15 ते 20 मिनिटे दुधामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर हे दूध गॅसवर उकळून त्यामध्ये चवीनुसार साखर टाका. मग शेवटी दुधामध्ये भिजवलेले खजूर यात टाका. तुमची खीर तयार आहे.
खजूर मध्ये अँटिऑक्सिडंट आढळतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. त्यामुळे मेंदूतील जळजळ ही कमी होते. खजूर खाल्ल्याने अल्झामरचा धोका कमी होतो आणि स्मरणशक्ती ही मजबूत होते. त्यामुळे मेंदू निरोगी आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी खजूर खाणे फायदेशीर ठरते.
खजुरामध्ये नैसर्गिक गोड पदार्थ असतात. ज्यामुळे ते चवीला गोड असले तरी आरोग्यासाठी हानिकारक नाही. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. खरे तर फायबर रक्तातील साखर हळूहळू सोडते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. खजूरमध्ये मॅगनीज, तांबे इत्यादी अनेक खनिजे असतात. ज्यामुळे शरीराचा विकास आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. ॲनिमिया वर मात करण्यासाठी तुम्ही खजूरचे सेवन करू शकतात. एवढेच नाही तर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात खजूर समाविष्ट करू शकता. खजूर मध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज पुरेशा प्रमाणात आढळतात. ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळण्यास मदत होते.