‘या’ गोष्टींसोबत खाऊ नये चिया बियाणे, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
चिया बियाणे सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. चिया बियाण्यांचे सेवन पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. परंतु चिया बियाणे खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नयेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
दररोजच्या धावपळीत शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहारात फळे आणि भाज्या तसेच ड्रायफ्रूट्सचा समावेश करतो. जेणेकरून या सर्व पदार्थांच्या सेवनाने आपल्या शरीराला योग्य पोषण मिळते. त्यांच्याबरोबर तुमच्या रोजच्या आहारात चिया बियाणे समाविष्ट करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. उन्हाळा असो किंवा हिवाळा आहारात चिया बियाणे समाविष्ट केल्याने शरीराला सर्व प्रकारचे फायदे मिळतात. त्यामुळे आपण फिट आणि तंदुरुस्त रहातो. तसेच चिया बियांना सुपरफूडच्या कॅटेगिरीत ठेवण्यात आले असून चिया बियाणे खाण्याचा एक वेगळी पद्धत आहे.
न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल सांगतात की,चिया बियांचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण हे बियाणे ओमेगा -3 फॅटी ॲसिड, फायबर, प्रथिने, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात – जे शरीराच्या बऱ्याच गरजा पूर्ण करण्यास मदत करतात. तसेच चिया बियाणे सेवन करताना या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
उच्च फायबर युक्त पदार्थांसह
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चिया बियाणे उच्च फायबर असलेल्या पदार्थांसोबत खाऊ नये. कारण चिया बियांमध्ये आधीच फायबरचे प्रमाण जास्त असते. जेव्हा चिया बियाणे उच्च फायबर युक्त पदार्थांसह खाल्ले जातात तेव्हा ते तुमच्या पाचन क्रियेस समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला पचनसंस्थेची समस्या असेल तर हे फूड कॉम्बिनेशन ट्राय करू नका.
दुग्धजन्य पदार्थ
बहुतेक लोक दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांसह चिया बियाणे खातात. परंतु ज्या लोकांना लैक्टोज लैक्टोज इनटॉलरेंस आहे त्यांनी दुग्धजन्य पदार्थांसह चिया बियाणे खाऊ नये. दुधात प्रथिने आणि फॅट अधिक असते, त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ आणि चिया बियाणे हे एकत्र खाल्याने पोट दुखीचा समस्याना सामोरे जाऊ शकते. कारण चिया बियाण्यांमध्ये असलेल्या फायबरचे आणि दुधातील प्रथिने आणि फॅट हे घटक एकत्र मिसळल्यास पचन कमी होऊ शकते. त्यामुळे तुमच्या पोटात गॅस, सूज येणे किंवा पोटात पेटके येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
साखरयुक्त पदार्थ
चिया बियाण्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही त्यांना उच्च साखरयुक्त पदार्थांसह खाल्ले तर तुमच्या शरीराला चिया बियाण्यांचा पूर्ण फायदा मिळणार नाही. कारण जास्त साखरचे प्रमाण असलेल्या पदार्थांमध्ये चिया बियाणांचे सेवन केल्यास तुमच्या शरीरात कॅलरीचे प्रमाण वाढू शकते. जर तुम्हीही रोज चिया बियाणे खात असाल तर ते कोणत्या गोष्टींसोबत खावे आणि कोणत्या खाऊ नये याबद्दलही तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे.