दिल दा मामला… बायकोला खूश ठेवण्यासाठी या गोष्टी करायलाच हव्या, नाही तर…

| Updated on: Nov 29, 2024 | 6:25 PM

स्त्रियांचा आनंद हा कुटुंबाच्या सुखाचा आधारस्तंभ आहे. त्यांना आनंदी ठेवण्यासाठी ऐकणे, त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम घालवणे, घरातील कामात मदत करणे आणि त्यांचा सन्मान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक स्पर्श देखील त्यांना आराम आणि आनंद देतो. या सोप्या पद्धतीने तुमच्या संसारातील सुख वाढवा आणि तुमच्या पत्नीचे जीवन आनंदमय करा.

दिल दा मामला... बायकोला खूश ठेवण्यासाठी या गोष्टी करायलाच हव्या, नाही तर...
Follow us on

स्त्रियांना सदैव सुखी आणि आनंदी ठेवणं वाटतं तितकं सोप्पं काम नाही. मग ती बायको असो, आई, बहीण, मैत्रीण असो की प्रेयसी, त्यांना सदैव आनंदीत ठेवणं फार किचकट असतं. काही ना काही कारणाने त्यांच्याशी वाद होतातच. त्यामुळे दोघांध्येही बिनसतं. त्यामुळे पुरुषांना राग येतो. पण अशावेळी पुरुषांनी बॅकफूटवर जाणं कधीही उत्तम. दोन पावलं मागे राहूनच पुरुषांनी स्त्रियांशी संवाद साधला पाहिजे. मूड पाहूनच त्यांच्याशी एखाद्या विषयावर चर्चा केली पाहिजे. महिलांना आनंदीत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे यावर टाकलेला हा प्रकाश.

ऐकणे

वाद होवो अथवा न होवो, बायको जे काही बोलेल त्यावर कोणताही प्रतिवाद न करता ऐकणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. तुम्ही जर ऐकून घेतलं नाही तर, घरात तणाव होऊ शकतो. घरातील कामे, ऑफिसमधील गोष्टी, इत्यादी स्त्रियांना सांगायच्या असतात. हे ऐकण्यासाठी पुरुषांनी मानसिकता तयार केली पाहिजे. समस्या सोडवली नाही तरी त्यांना ऐकणे, हे त्यांना आनंद आणि समाधान देणारे ठरते.

क्वॉलिटी टाइम

पत्नीला चांगला गिफ्ट द्यायचा असेल, तर तिच्यासोबत चांगला वेळ घालवणे हा एक उत्तम पर्याय आहे. फोन, टीव्ही वगैरे बंद करून थोडा वेळ तिच्यासोबत आनंदाने घालवा. एकत्र जेवण करा, चालायला जा, किंवा अन्य कोणतेही छोटे छोटे कामे एकत्रित करा. दिवसाला 15-30 मिनिटे असे करा. त्यानंतर फरक बघा.

मदत करा

स्त्रीया रोज दिवसभरात अनेक गोष्टींचा भार उचलत असतात. मुलांचा सांभाळ, घरकाम, ऑफिसचे काम आदी कामे त्या करत असतात. या कामात पुरुषांनी त्यांनी मदत केली पाहिजे. स्वयंपाकात मदत करणे, घराची साफसफाई करणे, किंवा मुलांना शाळेत सोडून देणे या सर्व गोष्टींमध्ये मदत केली तरी स्त्रिया आनंदीत होतात.

सन्मान करा

स्त्रिया अनेक कामे एकाच वेळी करतात. त्यामुळे त्यांना थकवा आणि मानसिक तणाव येऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांच्या कामांचे कौतुक करणे हे फार महत्वाचे आहे. ऑफिसमध्ये काहीतरी छान काम केल्यास किंवा नवीन कपडे घालून आली तरी त्यांचे कौतुक करा. त्यांचा सन्मान करा. इतरांसमोर त्यांचं कौतुक करा. त्यांना कमी लेखू नका.

शारीरिक स्पर्श

पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक भावनिक असतात. त्यांच्यात मूड स्विंग्स असतात. त्यामुळे त्यांना राग, दु:ख वगैरे देखील होऊ शकते. मानसिक थकवा असताना स्त्रियांना शारीरिक स्पर्श खूप आरामदायक वाटतो. त्यांचे हात धरणे, मिठी मारणे, किंवा गालावर एक चुंबन देणे या सर्व गोष्टी त्यांना त्वरित आनंद देऊ शकतात.