जाणून घ्या काय आहे बुलेटप्रूफ कॉफी, वजन कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी नव नवीन पद्धती वापरल्या जातात. आहारात प्रयोग केले जातात आणि त्यातीलच एक म्हणजे बुलेटप्रूफ कॉफी हे वजन कमी करणारे पेय सध्या ट्रेंडमध्ये आहे. ते कसे कार्य करते आणि त्याचे काय फायदे होतात ते जाणून घेऊ.

जाणून घ्या काय आहे बुलेटप्रूफ कॉफी, वजन कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर
जाणून घ्या काय आहे बुलेटप्रूफ कॉफी, वजन कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 6:42 PM

वजन कमी करण्यासाठी अनोख्या व्यायामासोबत महागडे डाएट प्लॅनही फॉलो केले जातात. याव्यतिरिक्त अनेक युक्त्या वापरल्या जातात. ज्या वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. अशीच एक युक्ती म्हणजे बुलेटप्रूफ कॉफी जी आजकाल ट्रेंड मध्ये आहे. ही कॉफी खूप पूर्वीपासून आहे परंतु आता लोक तिचा आहारात किंवा दिनचर्येत मोठ्या प्रमाणात समावेश करू लागलेत. कॉफीचे नाव अगदी वेगळे आहे. पण फॅटी असूनही ती वजन कमी करण्यास मदत करते ही एक प्रकारची बटर कॉफी आहे ज्यामध्ये बटर घातल्यानंतर कॉफी पिली जाते. बुलेटप्रूफ कॉफी प्यायल्याने आरोग्यालाही फायदा होतो. कॅलरीज बर्न होण्यासाठी त्याचा उपयोग होतो असा तज्ञांचं मत आहे. बुलेटप्रूफ कॉफी कशी तयार केली जाते? त्यासोबतच त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेऊ.

अशी तयार करा बुलेटप्रूफ कॉफी

ही कॉफी तयार करण्यासाठी तुम्हाला गरम कॉफी एक चमचा, MCT तेल किंवा खोबरेल तेल आणि अनसॉल्टेड बटर लागेल कॉफी तयार करण्यासाठी प्रथम गरम कॉफी तयार करा आणि त्यात मीठ नसलेले बटर आणि खोबरेल तेल टाका आणि तुमची कॉफी तयार. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ही कॉफी रोज पिऊ शकता पण कॉफी रोज पिण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

बुलेटप्रूफ कॉफी पिण्याचे फायदे

बुलेटप्रूफ कॉफी फॅट बर्न करते याद्वारे शरीरात केटोनोसिस प्रक्रिया सुरू होते कारण ती आपल्या चरबीचे केटोन्समध्ये रूपांतर करते. जेव्हा आपण दीर्घकाळ कार्बोहायड्रेट घेत नाही आणि ग्लुकोजची पातळी देखील खाली जाते तेव्हा चरबी जळण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत या प्रकारची कॉफी फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वाढवते याशिवाय ही कॉफी पिल्याने भूकही कमी होते आणि आपण जास्त खाणे टाळू शकतो. त्यामुळे ही कॉफी आपल्याला वजन कमी करण्यास मदत करते.

काही संशोधनात असे आढळून आले आहे की कॉफी आपल्याला ऊर्जा देण्यासोबतच भूक देखील मारते. बटर किंवा बुलेटप्रूफ कॉफीमध्ये बटर घालून तुम्ही निरोगी चरबी मिळवू शकता. त्यात MCT तेल टाकल्यास फायदा दुप्पट होतो.

या लोकांनी टाळावी बुलेटप्रूफ कॉफी

ही कॉफी वजन कमी करण्यास मदत करत असली तरी पोषण देत नाही जे लोक जेवण टाळतात आणि फक्त अशा पेयांवर अवलंबून असतात त्यांच्यात पोषक तत्वांची कमतरता असू शकते. त्यामुळे डोकेदुखी अशक्तपणा किंवा आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. यामध्ये फॅट जास्त असते त्यामुळे ज्यांना फॅट कमी करायचे आहे त्यांनी ही कॉफी पिऊ नये कारण त्यात खोबरेल तेल आणि बटर दोन्ही असतात त्यामुळे चरबी वाढू शकते.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.