मलायका अरोराने सांगितला हा ‘देसी उपाय’; चेहरा होईल चमकदार अन् ॲक्नेही होतील छुमंतर
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्याघरीच वेगवेगळ्या प्रकारचे 'देसी नुस्खे' ट्राय करुन पाहात असते. त्वचेवरील ॲक्नेची समस्या कायमसाठी दूर करण्यासाठी अभिनेत्री मलायका अरोरा हिने खास घरगुती उपाय सांगितला आहे.
त्वचेची काळजी आपण सगळेच घेतो. त्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. मग कधी पार्लर तर कधी महागड्या क्रीम आणि लोशन पण यामुळेसुद्धा कधी फरक पडतो तर कधी नाही. आणि अशा महागड्या ट्रीटमेंट आपल्याला फार परवडणाऱ्याही नक्कीच नसतात. त्यासाठी आपण घरगुती उपायांकडे वळतो आणि फक्त आपणच नाही तर अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या घरगुती उपयांना आपले सौंदर्य अजून वाढवतात. त्यातीलच एक आहे अभिनेत्री मलायका अरोरा जी 50 व्या वर्षीही ती अगदी 30, 35 वयाची दिसते. मलायका तिच्या त्वचेची काळजी कशी घेते आणि यासाठी ती काय वापरते हेही तिने सांगितले आहे.
त्वचेच्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे ॲक्ने. ॲक्नेमुळे आपल्या त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही बिघडून जाते. यामुळे त्वचेचा पोत बिघडून त्वचा खराब दिसू लागते. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार आणि प्रदूषण या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि ॲक्ने फार मोठ्या प्रमाणात येतात.
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरच्याघरीच वेगवेगळ्या प्रकारचे ‘देसी नुस्खे’ ट्राय करुन पाहात असते. त्वचेवरील ॲक्नेची समस्या कायमसाठी दूर करण्यासाठी अभिनेत्री मलायका अरोरा हिने खास घरगुती उपाय सांगितला आहे.
फेसपॅक कसा बनवायचा?
ॲक्ने प्रॉब्लेम कमी करण्यासाठी मलायकाने एक फेसपॅक सांगितला आहे. तर हा फेसपॅक कसा बनवायचा ते पाहू. 1/2 टेबलस्पून दालचिनी पावडर, 1 टेबलस्पून मध, 1 टेबलस्पून लिंबाचा रस या फक्त तीनच गोष्टी घ्यायच्या आहेत. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये, 1/2 टेबलस्पून दालचिनी पावडरमध्ये प्रत्येकी 1 टेबलस्पून मध आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस मिक्स करुन घ्यायचा आहे.
View this post on Instagram
आता या तिन्ही गोष्टी एकत्रित मिक्स करुन तयार झालेला फेसपॅक त्वचेवरील ज्या भागात ॲक्ने आहे त्या भागावर लावून घ्यावा. त्यानंतर हा फेसपॅक त्वचेवर 15 ते 20 मिनिटे किंवा संपूर्णपणे सुकेपर्यंत ठेवावा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्वचेवरील ॲक्नेची समस्या कमी करण्यासाठी हा फेसपॅक वापरणे अधिक फायदेशीर असल्याचे मलायकाने म्हटलं आहे.
या घरगुती उपायासोबतच अजून आपल्याला कशाची काळजी घ्यायची आहे ते पाहुयात.
पहिलं म्हणजे जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा ज्यामुळे अॅक्ने येणार नाही
मेक-अप केला असेल तर रात्री चेहऱ्यावरील मेक-अप काढून चेहरा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतरच झोपा.
बाहेर जाताना नेहमी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा
तसेच केसात कोंडा झाला असेल तर त्यावर आधी ट्रीटमेंट घ्या कारण तो चेहऱ्यावर पडल्यानेही अॅक्ने येऊ शकतात